---Advertisement---

माझ्या मुलांचा बाबा बनशील? जेव्हा अभिनेत्रीने मुंबई इंडियन्सच्या स्टार क्रिकेटरला घातली होती लग्नाची मागणी

On: रविवार, मे 23, 2021 8:49 AM
---Advertisement---

आयपीएल 2021 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू जेम्स नीशम आपला मूळ देश न्यूझीलंड येथे परतला आहे. निशम 8 मे रोजी ऑकलंडला येथे पोहोचला. तेथे तो 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहिला व त्यानंतर न्यूझीलंडच्या संघात सामील झाला आहे. आयपीएल 2021 च्या स्थगितीनंतर नीशम सोशल मीडियावर पहिल्यासारखाच खूप अ‍ॅक्टिव दिसत आहे. दरम्यान ट्विटरवर सध्या पाकिस्तानमधील एक अभिनेत्री आणि नीशम यांच्यातील संभाषणाचा एक जुना किस्सा पुन्हा व्हायरल होत आहे.

2019 मध्ये नीशमच्या एका ट्विटला रिप्लाय देत पाकिस्तानी अभिनेत्री सेहेर शिंवरीने नीशमला विचारले होते की, तुला माझ्या मुलांचे वडील व्हायला आवडेल का? तसेच तिने वाक्याच्या पुढे मजेशीर इमोजीस देखील जोडले होते. यावर नीशमने देखील उत्तर दिले होते की, ‘मला खरोखर वाटते की या इमोजीची काही गरज नाही.’

https://twitter.com/SeharShinwari/status/1166613046921441282?s=20

https://twitter.com/JimmyNeesh/status/1166617101580324864?s=20

दरम्यान नीशमच्या आयपीएल 2021 मधील कामगिरीचा विचार केला असता, त्याला मुंबई इंडियन्सकडून केवळ एक सामना खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात त्याने दोन षटकात एकही विकेट न घेता 26 धावा दिल्या व फलंदाजीतही शून्यावरच बाद झाला. यानंतर मात्र आयपीएल 2021 स्पर्धा स्थगित करण्यात आल्यामुळे नीशमला भारतीय क्रिकेट रसिकांना आपल्या खेळाचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली नाही.

नीशमच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला असता, त्याने न्यूझीलंडकडून 66 एकदिवसीय आणि 12 कसोटी सामने खेळलेले आहेत. नीशमने 66 एकदिवसीय सामन्यात फलंदाजीत 28 च्या सरासरीने 1320 धावा केलेल्या आहेत. यादरम्यान त्याने 6 अर्धशतके झळकावली असून नाबाद 97 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरलेली आहे. एकदिवसीय सामन्यातील त्याच्या गोलंदाजीचा विचार केला असता, त्याने 31 च्या सरासरीने 68 बळी मिळवलेले आहेत. 27 धावा देत 5 बळी मिळवणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.

नीशमच्या कसोटी कारकिर्दीचा विचार केला असता, त्याने फलंदाजीत 33 च्या सरासरीने 709 धावा केलेल्या आहेत. यादरम्यान नाबाद 137 ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिलेली आहे. गोलंदाजीतही त्याने 14 बळी मिळवलेले आहेत. फलंदाजी सोबतच गोलंदाजीतही उत्तम कामगिरी करण्याची क्षमता असलेल्या नीशमकडून सर्व क्रिकेटप्रेमींना आगामी काळात उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

असा प्रतिभाशाली मुंबईकर, ज्याला भारतीय संघ दूरच आयपीएलमध्येही मिळाली नाही पुरेशी संधी

प्रतिभेची खाण! अवघ्या १७ सामन्यात ११७ विकेट्स अन् ६३१ धावा, ‘हा’ अष्टपैलू ठोठावतोय टीम इंडियाचं दार

गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---