---Advertisement---

…आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट आऊट होता होता वाचला, पहा व्हिडिओ

On: शुक्रवार, ऑगस्ट 2, 2019 5:57 PM
---Advertisement---

बर्मिंगहॅम। गुरुवारपासून (1 ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना एजबस्टन स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने पहिल्या डावात कालच्या 10 धावांवरुन पुढे खेळायला सुरुवात केली. या डावात इंग्लंडचा कर्णधार जो रुटला चेंडू स्टंम्पला लागूनही बेल्स न पडल्याने जीवदान मिळाले आहे.

झाले असे की तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रुटने चांगली सुरुवात केली होती. पण 35 चेंडूत 9 धावांवर खेळत असताना इंग्लंडच्या पहिल्या डावातील 21 व्या षटकात पॅटिन्सनने टाकलेला शेवटच्या चेंडूवर रुटने बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न केला. पण हा चेंडू ऑफस्टम्पला घासून यष्टीरक्षक टिम पेनकडे गेला.

त्यामुळे सुरुवातीला ऑस्ट्रेलिया संघाने चेंडू रुटच्या बॅटला लागून पेन कडे गेला असल्याचे समजून रुट बाद असल्याचे अपील केले. यावर पंचांनीही त्याला बाद दिले. पण रुटने लगेचच डीआरएस घेतला. त्यामध्ये चेंडू बॅटला लागला नसल्याचे दिसले. मात्र चेंडू स्टंम्पला लागला असल्याचे स्पष्ट दिसले.

तसेच नंतर दाखवण्यात आलेल्या रिप्लेमध्येही चेंडू स्टंम्पला लागल्याचे आणि बेल्स थोडेसे हलल्याचे दिसले. पण बेल्स पडले नसल्याने रुटला जीवदान मिळाले. त्यानंतर पॅटिन्सन आणि पंचांनी बेल्स तपासूनही पाहिले.

चेंडू स्टंम्पला लागल्यानंतरही बेल्स न पडण्याच्या घटना याआधीही 2019 विश्वचषकात घडल्या आहेत. तसेच अशाच प्रकारच्या घटना यावर्षीच्या आयपीएल दरम्यानही पहायला मिळाल्या होत्या. त्यावेळीही याबद्दल बरीच चर्चा झाली होती.

ऍशेसच्या या पहिल्या सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रापर्यंत पहिल्या डावात 1 बाद 71 धावा केल्या आहेत. रुट 11 धावांवर आणि रॉरी बर्न्स 41 धावांवर खेळत आहे. त्याआधी काल(1 ऑगस्ट) ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 284 धावा केल्या आहेत.

https://twitter.com/englandcricket/status/1157255983959334912

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

संपूर्ण वेळापत्रक: असा असेल टीम इंडियाचा उद्यापासून सुरु होणारा वेस्ट इंडीज दौरा

विराट कोहलीच्या मदतीला धावून आला भारताचा हा दिग्गज कर्णधार

काय सांगता! अंपायरने ऍशेसच्या पहिल्याच दिवशी दिले ७ चूकीचे निर्णय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment