---Advertisement---

…. म्हणूनच जसप्रीत बुमराह यशस्वी गोलंदाज, ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने उधळली स्तुतीसुमने

On: रविवार, डिसेंबर 6, 2020 1:31 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी20 मालिकेनंतर 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. कसोटी मालिकेच्या तयारीसाठी सर्व खेळाडू कसून सराव करत आहेत. याचाच भाग म्हणून भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ या दोन संघात तीन दिवसांचा सराव सामनाही खेळला जाणार आहे. मात्र, कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूने एक खुलासा केला आहे.

कसोटी मालिकेचा भाग असलेल्या ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाजाने भारताचा युवा गोलंदाज जसप्रीत बुमराहची प्रशंसा केली आहे आणि त्याला विश्वास आहे की त्याने बुमराहकडून बऱ्याच गोष्टी शिकल्या.

मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल मी भाग्यवान

पॅटिन्सनने ऑस्ट्रेलियन असोसिएटेड प्रेसच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, “मी खूप भाग्यवान आहे, कारण आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळाली.”

बुमराहच्या मनाचे आकलन करण्यात यशस्वी

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील मुंबई इंडियन्सचा भाग आहे. बुमराहचे कौतुक करताना पॅटिन्सन म्हणाला की, “बुमराह टी-20 प्रकारात जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. मी त्याच्या मनाचे आकलन करण्यात यशस्वी ठरलो. मी त्याच्या यॉर्कर चेंडूबद्दल आणि त्याच्या अचूकतेबद्दल विचार करत होतो.”

…म्हणूनच बुमराह यशस्वी

“बुमराह विलक्षण आहे आणि त्याची गोलंदाजी करण्याची पद्धतही वेगळी आहे. त्याला अधिक उंचीवरून चेंडू फेकायला आवडते. असे करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य त्याला आहे आणि म्हणूनच तो यशस्वी आहे,”असेही पुढे बोलताना पॅटिन्सन म्हणाला.

पॅटिन्सनसाठी कोणत्याही संघाने लावली नव्हती बोली

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या लिलावादरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनसाठी कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. परंतु मुंबई इंडियन्सचा स्टार वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने आयपीएल 2020 मधून माघार घेतल्यामुळे मुबंईने त्याला संघात स्थान दिले. या हंगामात त्याने चांगली कामगीरी केली आणि 10 सामन्यांत 11 बळी घेतले.

महत्त्वाच्या बातम्या –

पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा वेस्ट इंडिजवर मोठा विजय, ‘हा’ खेळाडू ठरला सामनावीर 

टीम इंडियासाठी आनंदाची गोष्ट; अजिंक्य रहाणेची ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ संघाविरुद्ध शतकी खेळी

‘हा’ क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर टाकत आहे दबाव, दिग्गजाची प्रतिक्रिया 

ट्रेंडिंग लेख –

गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग

‘बर्थडे बॉय’ रविंद्र जडेजाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?

भारताच्या ‘या’ ५ दिग्गज क्रिकेटपटूंचा आज आहे वाढदिवस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---