---Advertisement---

बंगालचा वाघ आता खेळणार पायरेट्स संघासाठी, जँग कुन लीवर लागली ‘इतक्या’ लाखांची बोली

On: मंगळवार, ऑगस्ट 31, 2021 12:09 AM
---Advertisement---

गेल्या काही महिन्यांपासून प्रो कबड्डीच्या लिलावाची आतुरतेने वाट पाहिली जात होती. अखेर तीन दिवसीय लिलाव सोहळ्याचे आयोजन मुंबईमध्ये करण्यात आले आहे. या लिलावातील पहिल्या दिवशी (२९ ऑगस्ट) अवघ्या ४ खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती. तर लिलावाच्या दुसऱ्या दिवशी फ्रेंचाइजींनी अनुभवी खेळाडूंना आपल्या संघात समाविष्ट करण्यावर भर दिला. दरम्यान जँग कुन लीला पटना पायरेट्स संघाने आपल्या संघात स्थान दिले आहे.

दक्षिण कोरिया संघातील आघाडीचा चडाईपटू जँग कुन लीला प्रो कबड्डीच्या ८ व्या हंगामासाठी पटना पायरेट्स संघाने आपल्या संघात स्थान दिले आहे. जँग कुन लीने प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामात बंगाल वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तेव्हापासून तो बंगाल वॉरियर्स संघातच होता. परंतु तो आता आगामी हंगामात पटना पायरेट्स संघासाठी खेळताना दिसून येणार आहे. त्याला पटना पायरेट्स संघाने २०.५ लाखांची बोली लावून आपल्या संघात स्थान दिले आहे.(Jang kun lee sold to Patna pirates for pkl season 8)

अशी राहिली आहे कारकीर्द
जँग कुन ली प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामा पासून बंगाल वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.त्याने या संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. त्याने आतापर्यंत प्रो कबड्डी लीग स्पर्धेत एकूण ९० सामने खेळले आहेत. या दरम्यान चढाई करताना त्याने ४११ गुणांची कमाई केली आहे. तर बचाव करताना त्याने २२ गुणांची कमाई केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

पीकेएल लिलावाचा दुसरा दिवस विक्रमी, परदीप, सिद्धार्थ झाले ‘करोडपती’; पाहा बोली लागलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

‘रेकॉर्ड ब्रेकर’ परदीप नरवाल प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, तब्बल ‘इतक्या’ कोटींची लागली बोली

प्रो कबड्डी लिलाव: ‘बाहुबली’ सिद्धार्थ देसाई झाला करोडपती; तेलगु टायटन्सने ‘इतक्या’ कोटींमध्ये केले कायम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---