वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरने बिग बॅश लीगमध्ये सहभागी होताच पदार्पणाच्या सामन्याची विजयाने सुरुवात केली. बीबीएल स्पर्धेत होल्डर सिडनी सिक्सर्स संघाकडून खेळत आहे. या संघाने रविवारी(20 डिसेंबर) बेल्लेराइव ओव्हल मध्ये ऍडलेड स्ट्रायकर्स संघाला 36 धावांनी पराभूत केले.
पदार्पणाच्या सामन्यात केली दमदार कामगिरी
बीबीएल स्पर्धेत आपला पहिला सामना खेळत असलेल्या जेसन होल्डरने नाबाद 11 धावांची खेळी केली आणि गोलंदाजीत 26 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. सिडनी सिक्सर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्स गमावून 177 धावा केल्या होत्या. त्यानंतर 178 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऍडलेड संघाने 7 विकेट्स गमावून फक्त 139 धावा केल्या.
पहिल्याच चेंडूवर ठोकला गगनचुंबी षटकार
या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेसन होल्डरने वेळ वाया न घालवता बीबीएल स्पर्धेतील आपल्या पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार लगावला. होल्डरने वेगवान गोलंदाज वेस एगरच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार खेचला. हा कोणता सामन्य शॉर्ट पीच चेंडू नव्हता. होल्डरने आपल्या पायाचा चांगला वापर करत स्क्वेअर लेग सीमारेषेवर दमदार फटका लगावला. होल्डरचा या षटकाराचा चेंडू चक्क झाडावर जाऊन अडकला. त्यामुळे पंचांना दुसरा चेंडू मागवण्याचा निर्णय घ्यावा लागला.
Backyard stuff here! 🏡
The new kid (or West Indies captain in this case) comes over, and loses the ball first hit! Unbelievable 🙄 #BBL10 pic.twitter.com/yJugaCuXMN
— KFC Big Bash League (@BBL) December 20, 2020
जेसन होल्डरने हा चेंडू झाडावर अडकवल्यामुळे पुढचा चेंडू टाकण्यासाठी वेळ लागला. चेंडू झाडाच्या फांदीवर जाऊन अडकला होता. प्रेक्षक चेंडू काढण्याचा खुप प्रयत्न करत होते, मात्र चेंडू काढू शकले नाहीत. जेव्हा चेंडू माघारी आला नाही तेव्हा मैदानावरील पंचाने दुसरा चेंडू मागवण्याचा निर्णय घेतला.
बीबीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान दुसरे अर्धशतक
या सामन्यात सिडनी सिक्सर्स संघाकडून डॅनियल क्रियश्चनने 15 चेंडूत अर्धशतक झळकवले होते. त्याने बीबीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान दुसरे अर्धशतक लगावले. आपल्या डॅनियलने 5 षटकार आणि 4 चौकार ठोकले. सिडनी सिक्सर्स संघाचा पुढील सामना बॉक्सिंग डे (26 डिसेंबर) दिवशी क्वीन्सलँडच्या केर्रेरा ओव्हल मध्ये मेलबर्न स्टार्स सोबत खेळला जाणार आहे.
जेसन होल्डर बीबीएल स्पर्धेतून जाणार बाहेर
आशा आहे की जेसन होल्डर वेस्ट इंडिजला माघारी जाण्यापूर्वी मेलबर्न रेनेगेड्स विरुद्ध खेळेल. जेसन होल्डरला बांगलादेश विरुद्ध होणार्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व करायचे आहे. त्यामुळे जेसन होल्डरला बीबीएल स्पर्धा मध्यातच सोडून जावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिडिओ: भारतीय संघ सरावात घेतोय कठोर मेहनत, दुसर्या कसोटीतील प्लेइंग इलेव्हनचेही मिळाले संकेत
“मी, झहीर, हरभजन, सेहवाग, आमच्यापैकी कोणीही विचार केला नव्हता धोनी कर्णधार होईल”
‘तुझ्या पत्नीला माझ्या शुभेच्छा दे’, स्टीव स्मिथने विराटला पहिल्या कसोटीनंतर दिला संदेश