दक्षिण आफ्रिकेने दुसर्या कसोटी सामन्यात यजमान वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवले आहे. वेस्ट इंडिजला ३२४ धावांचे लक्ष्य मिळाले. तिसर्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर वेस्ट इंडिजने बिनबाद १५ धावा केल्या. संघाला अजूनही जिंकण्यासाठी ३०९ धावा कराव्या लागतील. सामन्यात अजून दोन दिवसांचा खेळ बाकी आहेत. दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत सध्या दक्षिण अफ्रिका १-० ने आघाडीवर आहे. दरम्यान, दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार जेसन होल्डरने एक अफलातून झेल घेतला.
रविवारी (२० जून ) सामन्याच्या तिसर्या दिवशी जेसन होल्डरने स्लिप्सवर शानदार झेल घेतला. दक्षिण अफ्रिकेच्या डावातील २७ व्या षटकातील दुसर्या चेंडूवर केशव महाराजनी वेगवान गोलंदाज जयडेन सिल्सच्या चेंडूवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो चेंडूला जमिनीवर ठेवू शकला नाही. दुसर्या स्लिपवर उभे असलेल्या होल्डरने हवेत लांब उडी घेतली आणि एका हाताने चेंडू पकडला. त्याच्या या झेलाने सर्वच आश्चर्यचकीत झाले. यानंतर संपूर्ण संघाने होल्डरसह आनंद व्यक्त केला.
Jason Holder, that is outrageous. 😱🙇♂️ pic.twitter.com/np8gcAkDP5
— Cricket on TNT Sports (@cricketontnt) June 20, 2021
सामन्याच्या पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेने २९८ धावा केल्या तर दुसऱ्या डावात १७४ धावा केल्या. पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा संघ केवळ १४९ धावा करू शकला. वेस्ट इंडिज संघाला सध्याच्या मालिकेच्या तीन डावांपैकी एकामध्येही २०० धावांचा टप्पा गाठता आला नाही. अशा परिस्थितीत त्यांना विजयासाठी एक आश्चर्यजनक कामगिरी करावी लागेल . दक्षिण अफ्रिकेने पहिली कसोटी एक डाव आणि ६३ धावांनी जिंकली. अशा परिस्थितीत संघाला ही कसोटी जिंकून मालिका काबीज करण्याची संधी आहे.
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी -२० मालिकादेखील होणार आहे. यावर्षी होणाऱ्या टी -२० विश्वचषकाच्यादृष्टीने ही मालिका महत्त्वपूर्ण आहे. वेस्ट इंडिजने टी -२० मध्ये चांगली कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत त्यांना मालिकेत चांगली कामगिरी करायला आवडेल. वेस्ट इंडीज संघ हा दोनदा टी -२० विश्वचषक जिंकणारा एकमेव संघ आहे.
महत्वाच्या बातम्या
WTC Final, INDvsNZ Live: संपूर्ण चौथ्या दिवसावर पावसाचे सावट; खेळ सुरु होण्यास उशीर
‘पुजारामुळे नॉन स्ट्राईकवरील फलंदाजाला बाद होण्याचा धोका’; पाहा कुणी केलंय हे वक्तव्य?
‘रहाणे स्वार्थी, आपलं अर्धशतक पूर्ण करण्याच्या नादात बाद झाला,’ दिग्गजाचे मोठे वक्तव्य