---Advertisement---

बुमराह आला, विषय संपला! इंग्लंडच्या ६ विकेट्स घेत दिग्गजांच्या यादीत सामील, नेहराला सोडले मागे

On: मंगळवार, जुलै 12, 2022 9:17 PM
Jasprit-Bumrah
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मंगळवारी (१२ जुलै) खेळला गेला. द ओव्हल स्टेडियमवर खेळल्या गेलल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजी आक्रमानाने निर्विवाद वर्चस्व केले. इंग्लिश फलंदाजांपैकी एकालाही अर्धशतक करता आले नाही. भारतीय गोलंदाजांपैकी विशेषतः जसप्रीत बुमराहचे प्रदर्शन खूपच जबरदस्त होते. या प्रदर्शनाच्या जोरावर बुमराहने दिग्गजांच्या यादीत स्वतःचे स्थान बनवले आहे.

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) भारतीय संघासाठी एखाद्या एकदिवसीय सामन्यात सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. माजी दिग्गज स्टुअर्ट बिन्नीने भारतासाठी एकदिवसीय सामन्यात सर्वोत्तम प्रदर्शन केले होते. त्याने या सामन्यात अवघ्या ४ धावा खर्च करून ६ विकेट्स घेतल्या होत्या. माजी दिग्गज अनिल कुंबळे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत, ज्यांनी एका सामन्यात १२ धावा खर्च करून ६ विकेट्स घेतल्या होत्या. बुमराह या यादीत आता तिसऱ्या क्रमांकावर आला असून त्याने इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात १९ धावा खर्च करून ६ विकेट्स घेतल्या. आशीष नेहरा चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याने २३ धावा खर्च करून ६ विकेट्स घेतल्या होत्या.

एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणारे गोलंदाज

स्टुअर्ट बिन्नी- ६/४
अनिल कुंबळे – ६/१२
जसप्रीत बुमराह – ६/१९
आशीष नेहरा – ६/२३

दरम्यान, इंग्लंड आणि भारत यांच्यातील या पहिल्या एकदिवसीय सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचे फलंदाज अपयशी ठरले. ५० षटकांच्या या सामन्यात इंग्लंड अवघ्या २५.२ षटके खेळला आणि ११० धावांपर्यंत मजल मारू शकला.

भारतासाठी बुमराहने सर्वाधिक विकेट्स घेतल्या, पण मोहम्मद शमीनेही उत्कृष्ट गोलंदाजी केली. शमीने ७ षटकांमध्ये ३१ धावा खर्च करून मगत्वाच्या तीन विकेट्स घेतल्या. तसेच युवा प्रसिद्ध कृष्णानेही एक विकेट घेतली. इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय, जो रुट, बेन स्टोक्स आणि लियाम लिविंगस्टोन यांनी शून्य धावांवर विकेट गमावल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

भारताने घेतलीये विश्वविजेत्यांची मज्जा! पहिल्या वनडेत हवेत उडणाऱ्या इंग्लंडला आदळलंय जमिनीवर

बुमराह अन् शमीने पार धुव्वा केलाय! एक-दोन नाही इंग्लंडच्या तीन फलंदाजांना धाडलंय शून्यावर तंबूत

पेढे वाटा पेढे! केकेआरच्या ‘या’ क्रिकेटरच्या घरी आला नवा पाहुणा, पत्नीने गोंडस मुलाला दिला जन्म

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---