पुढच्या महिन्यापासून ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक सुरू होणार आहे. 15 सप्टेंबर पर्यंत संघ घोषित होणार आहेत. पण त्यापूर्वी भारतीय संघासाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जयप्रीत बुमराह आणि त्याचसोबत हर्षल पटेल यांना दुखापतीमुळे आशिया चषक 2022 मध्ये खेळता आले नव्हते. आता त्यांच्या फिटनेसविषयी महत्वाची माहिती मिळाली आहे.
माध्यांतील वृत्तांनुसार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि हर्षल पटेल (Harsal Patel) यांनी दुखापतीमुळे आशिया चषक (Asia Cup 2022) खेळला नसला, तरी आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) दोघेही पूर्णपणे फिट होतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुमराह आणि हर्षलने विश्रांतीच्या काळात त्यांची फिटनेस पुन्हा मिळवली आहे. अशात असा अंदाज बांधला जात आहे की, विश्वचषक स्पर्धेत हे दोन्ही महत्वाचे गोलंदाज खेळतील.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी हर्षल पटेलने अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत हर्षल पटेल दुखापतीतून सावरल्याचे दिसत आहे आणि नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव देखील करत आहे. असे असले तरी, बुमराहच्या फिटनेस संबंधित कुठलेही मोठे संकेत अद्याप मिळू शकले नाहीत. चाहते या दोघांना पुन्हा एकदा भारतीय संघाच्या निळ्या जर्सीमध्ये पाहण्यासाठी वाट उत्सुक आहेत.
आशिया चषक 2022 मध्ये भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज काही खास कामगिरी करू शकले नाहीत. शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजांनी अपेक्षित प्रदर्शन न केल्यामुळे संघाला त्याचे नुकसान सोसावे लागले. परंतु या दोन्ही खेळाडूंच्या पुनरागमनाने संघ शेवटच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करू शकतो. बुमराह आणि हर्षल दोघेही शेवटच्या षटकांमध्ये नेहमीच किफायतशीर गोलंदाजी करत आले आहेत. त्यांची ही गुणवत्ता आगामी टी-20 विश्वचषकात भारतीय संघासाठी खूपच महत्वाची असेल. या दोघांच्या अनुपस्थितीत भारतीय संघ आशिया चषकात ग्रुप स्टेजमधील दोन्ही सामने जिंकला. परंतु सुपर फोरमधील सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आणि अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर पडला. आशिया चषकाचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान संघांमध्ये खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
US Open 2022: इगा स्विएटेकने ओन्स जॅबेयूरचा पराभव करत जिंकले कारकिर्दीतील तिसरे ग्रँड स्लॅम
फिंचच्या शेवटच्या वनडे सामन्यात स्मिथचा धुमाकूळ! झंझावाती शतकाने जिंकली उपस्थितांची मने
एकाच दिवसात श्रीलंका गाजवणार 2 आशियाई स्पर्धांवर वर्चस्व! क्रिकेटसह ‘हा’ खेळ जिंकण्याची सुवर्णसंधी