भारतीय संघातील मुख्य जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्टार स्पोर्ट्स चॅनेलची अँकर संजना गणेशन यांनी १५ मार्च,२०२१ रोजी गोव्यामध्ये विवाह केला. त्यांच्या विवाहाबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या, अखेर १५ मार्चला विवाह झाल्यानंतर बुमराहने आणि संजनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांना ही आनंदाची बातमी दिली होती. नुकताच या नवविवाहित जोडप्याच्या विवाहाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड शेअर केला जात आहे.
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी गोव्यामध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विवाह केला. या विवाहात कुटुंबातील काही सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. तसेच विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या मंडळींवर मोबाईल वापरण्यास निर्बंध लावण्यात आले होते.
पण, या विवाह सोहळ्यानंतर मात्र, त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. नुकताच द वेडिंग फिल्मर या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यांचा विवाह सोहळ्याचा एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे. ज्यामध्ये दोघांचा विवाह सोहळ्यातील काही महत्त्वाचे क्षण दाखवण्यात आले आहेत. तसेच ते दोघेही या व्हिडिओमध्ये खूप आनंदी दिसून येत आहे.
https://www.instagram.com/p/CMrPzUOHryn/
यापूर्वी देखील जसप्रीत आणि संजना यांचे विवाहातील फोटो व्हायरल झाले होते. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांच्या रिसेप्शन सोहळ्यातील फोटोंची सोशल मीडियावर भरपूर चर्चा सुरू होती.
कोण आहे संजना गणेशन?
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन ही एक मॉडेल आणि अँकर आहे. तसेच ती आयपीएल स्पर्धेत प्रेसेंटर म्हणुन कार्यरत असते. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२१ स्पर्धेच्या लिलावात देखील ती होस्ट म्हणून पाहायला मिळाली होती. क्रिकेट व्यतिरिक्त ती बॅडमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांना देखील होस्ट करतांना पाहायला मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
असा रनआऊट तुम्ही पाहिला नसेल! जिमी नीशमने फुटबॉल स्किल दाखवत केले तमिमला बाद, पाहा व्हिडिओ