आयपीएल २०२१ मध्ये गुरूवारी (२९ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने ७ गड्यांनी बाजी मारली. यासह मुंबईने गुणतालिकेतील पहिल्या चार संघातील आपले स्थान कायम राखले. या सामन्यापूर्वीचा मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व राजस्थानचा फिरकीपटू श्रेयस गोपाल यांचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे.
बुमराह-गोपालचा धमाल व्हिडिओ
राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू श्रेयस गोपाल हा मजेदार स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा हरभजन सिंग, जसप्रीत बुमराह व रविचंद्रन अश्विन यांच्या गोलंदाजीची नक्कल करतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता. यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया आल्या होत्या.
उभय संघ आमनेसामने येण्यापूर्वी दोन्ही संघ सराव करत असताना, श्रेयस गोपाल व जसप्रीत बुमराह यांची भेट झाली. या दरम्यान दोघेही मजामस्ती करताना दिसून आले. गोपालने बुमराहसमोर त्याच्या गोलंदाजी शैलीची नक्कल करून दाखवली. बुमराहने यावर एक स्मितहास्य केले. त्यानंतर लगेचच बुमराहने मी देखील तुझ्यासारखी गोलंदाजी करू शकतो असे म्हणत, त्याच्याप्रमाणे गोलंदाजी केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.
When Jasprit Gopal met Shreyas Bumrah… ????#MIvRR | #HallaBol | #IPL2021 pic.twitter.com/smvP39N1TV
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 29, 2021
मुंबईचा तिसरा विजय
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना जोस बटलर (४१), कर्णधार संजू सॅमसन (४२), यशस्वी जयस्वाल (३२) व शिवम दुबे (३५) यांच्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर १७१ धावा धावफलकावर लावल्या. मुंबईसाठी राहुल चाहरने २ बळी मिळवले.
प्रत्युत्तरात, क्विंटन डी कॉकने नाबाद ७० धावांची खेळी करत मुंबई संघाचा विजय सोपा केला. मुंबईने १८.३ षटकात ३ विकेट्स गमावत १७२ धावांचे आव्हान पार केले. आयपीएल २०२१ च्या हंगामातील मुंबईचा हा तिसरा विजय आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पोलार्डच्या बॅटनेच नाही तर हेल्मेटनेही चेंडू जातो सीमापार, विश्वास नसले तर पाहा हा व्हिडिओ
पहिल्याच षटकात ६ चौकार मारणाऱ्या पृथ्वी शॉचे सामन्यानंतर शिवम मावीने धरले मानगूट, पाहा व्हिडिओ
पृथ्वी शॉच्या पहिल्याच षटकातील ६ चौकारांमुळे शिवम मावीच्या नावावर झाला ‘हा’ नकोसा विक्रम






