---Advertisement---

Video: बुमराहला भिडली इंग्लंडची टीम, मग काय कर्णधार कोहलीने लॉर्ड्सच्या गॅलरीतूनच केली शिवागाळ

On: सोमवार, ऑगस्ट 16, 2021 9:15 PM
---Advertisement---

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील शेवटच्या दिवशी (१६ ऑगस्ट) दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते.

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी इंग्लिश गोलंदाजांचा घाम काढला होता. त्यावेळी इंग्लिश गोलंदाज मार्क वूड आणि जोस बटलरने जसप्रीत बुमराहला असे काहीतरी म्हटले होते, ज्यानंतर जसप्रीत बुमराह प्रचंड तापला होता. दरम्यान, विराट कोहली देखील आक्रमक झाला होता. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ही घटना भारताच्या दुसऱ्या डावातील ९२ वे षटक झाल्यानंतर घडली होती. जेव्हा मार्क वूडने जसप्रीत बुमराहला काहीतरी म्हटले होते, त्यानंतर बुमराहने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले होते. या प्रकरणात इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलरने देखील हस्तक्षेप केले होते. त्यावेळी कर्णधार जो रूट देखील तिथे उपस्थित होता. परंतु, एकट्या बुमराहने या खेळाडूंना जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

विराट कोहलीने केला अपशब्दाचा वापर
मैदानावर जे सुरू होते, तो सर्व प्रकार विराट कोहली बाहेरून पाहत होता. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक गॅलरीत उभा असलेला विराट त्यावेळी खूप आक्रमक झाला होता, ज्यावेळी जसप्रीत बुमराहने वूडच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला होता. त्यावेळी विराट कोहली रागात टाळ्या वाजवताना दिसून आला होता, तसेच त्याने अपशब्दांचा देखील वापर केला होता. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.(Jasprit bumrah battle with jos Buttler and mark wood, Virat kohli abuse English players watch video)

https://twitter.com/tyrion_jon/status/1427226814695440384?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1427226814695440384%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-india-vs-england-2nd-test-jasprit-bumrah-battle-with-jos-buttler-mark-wood-virat-kohli-abuse-english-players-video-3696555.html

इंग्लंड संघाची खराब सुरुवात 
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी फलंदाजीमध्ये मोलाचे योगदान दिल्यानंतर आता गोलंदाजीमध्येही संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे.२७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला जसप्रीत बुमराहने पहिला धक्का दिला. त्याने रॉरी बर्न्सला भोपळाही न फोडता माघारी धाडले होते. तसेच डोम सिब्लेला देखील मोहम्मद शमीने ० धावांवर माघारी धाडले होते. त्यानंतर जॉनी बेअरस्टो (२), हसीब हमीद (९) आणि जो रुट (३३) हे देखील बाद झाले. त्यामुळे इंग्लंड अवस्था ५ बाद ६८ धावा अशी झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

ग्रँड वेलकम! इंग्लंडच्या गोलंदाजांचा घाम काढल्यानंतर कोहली अँड कंपनीने बुमराह-शमीचे ‘असे’ केले स्वागत

एकटाच पुरेसा! इंग्लंडच्या खेळाडूंचा बुमराहशी पंगा, मग काय एकट्यानेच सगळ्यांना शिकवला धडा

दुर्देवी! पंतकडून लाखो चाहत्यांचा अपेक्षाभंग, इंग्लिश गोलंदाजांच्या चेंडूवर दिला सोपा झेल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---