टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये शानदार गोलंदाजी केली आहे. दरम्यान जसप्रीत बुमराहने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. बुमराहने आपल्या संघाचा माजी कर्णधार कपिल देवचा विक्रम मोडीत काढला आहे. जसप्रीत बुमराह आता ऑस्ट्रेलियन भूमीवर भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ऑस्ट्रेलियात 50 विकेट्स घेण्याचा विक्रम केला. सर्वात कमी सामन्यांमध्ये आणि सर्वोच्च सरासरीने ही कामगिरी करणारा तो भारतीय गोलंदाज ठरला.
जसप्रीत बुमराहने ब्रिस्बेन गाबा कसोटी सामन्याच्या ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात मार्नस लॅबुशेनला झेलबाद केल्यावर तो कपिल देवच्या पुढे गेला. कपिल देव यांनी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये 51 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र आता जसप्रीत बुमराहच्या ऑस्ट्रेलियात कसोटी विकेट्सची संख्या 52 वर पोहोचली आहे. जसप्रीत बुमराहची सरासरीही कपिल देवपेक्षा चांगली आहे. कपिल देव यांंनी 24.58 च्या सरासरीने 51 विकेट घेतल्या होत्या तर जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियात 17.21 च्या सरासरीने विकेट घेतल्या आहेत. सध्याच्या कसोटी मालिकेत त्याने तीन सामन्यांत 20 बळी घेतले आहेत.
आता ऑस्ट्रेलियात भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेण्याच्या बाबतीत बुमराह पहिल्या क्रमांकावर, कपिल देव दुसऱ्या क्रमांकावर आणि अनिल कुंबळे तिसऱ्या क्रमांकावर आहे. कुंबळेने ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटमध्ये 49 बळी घेतले. तर रविचंद्रन अश्विन चौथ्या स्थानावर आहे. अश्विनने ऑस्ट्रेलियन परिस्थितीत कांगारू संघाविरुद्ध 40 विकेट्स घेतल्या आहेत. बिशन सिंग बेदी या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. ज्यांनी ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटमध्ये 35 विकेट्स घेण्यात यश मिळवले होते.
ऑस्ट्रेलियात भारतासाठी सर्वाधिक कसोटी विकेट (सरासरी)
52 विकेट्स – जसप्रीत बुमराह (17.21)
51 विकेट्स – कपिल देव (24.58)
49 विकेट्स – अनिल कुंबळे (37.73)
40 विकेट्स – रविचंद्रन अश्विन (42.42)
35 विकेट्स – बिशनसिंग बेदी (27.51)
हेही वाचा-
वेस्ट इंडिजचा कमबॅक, टीम इंडियाचा दारुण पराभव; मालिका बरोबरीत
मुंबईमध्ये येताच या खेळाडूचे नशीब उजळले, किवीसंघाचे कर्णधारपद मिळाले
स्मृती मानधनाने रचला इतिहास, टी20 मध्ये अशी कामगिरी करणारी पहिलीच खेळाडू