---Advertisement---

आठ वर्षांपूर्वी विराटच्या विकेटसह बुमराहने घेतली होती आयपीएलमध्ये रॉयल एन्ट्री; आता म्हणतोय…

On: रविवार, एप्रिल 4, 2021 9:11 PM
---Advertisement---

आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आपले ६ वे जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या ९ एप्रिल पासून आयपीएल २०२१ हंगामाला सुरुवात होत आहे. या हंगामातील पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघामध्ये रंगणार आहे. या मोठ्या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव देखील करत आहे. तसेच आजचा दिवस (४ एप्रिल) हा जसप्रीत बुमराहसाठी अतिशय खास आहे.

बुमराहने या खास दिवसाची आठवण करून देणारे एक ट्विट केले आहे. जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जसप्रीत बुमराहने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत तो भारतीय संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावत आहे. पण त्यापूर्वी त्याने आजच्याच दिवशी २०१३ मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती.

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात ४ एप्रिल २०१३ रोजी झालेली लढत आजही सर्वांच्या स्मरणात असेल. त्या सामन्यात सर्वांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करणारा युवा गोलंदाज पाहायला मिळाला होता आणि पहिल्याच सामन्यात विराट कोहली आणि मयंक अगरवाल सारख्या फलंदाजांना बाद करून तो गेला होता. तो गोलंदाज म्हणजे बुमराह. तेव्हापासून तो आतापर्यंत तो मुंबई इंडियन्स संघासाठी देखील महत्वाची भूमिका बजावत आहे.

जसप्रीत बुमराहने याच खास दिवसाची आठवण करून देणारे एक ट्विट केले आहे. ज्यावर चाहते आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत. त्याने २०१३ मधील फोटो शेअर करत लिहिले आहे की, “८ वर्ष, असं वाटत आहे की कालचीच गोष्ट आहे. पुन्हा एकदा मैदानात जाण्यासाठी आणखी वाट पाहु शकत नाही.”

८ वर्षांपूर्वी जसप्रीत बुमराहला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याने संधीचे सोने करत ४ षटकात ३२ धावा देत ३ गडी बाद केले होते. यात विराट कोहली, मयंक अगरवाल आणि करूण नायर यांचा समावेश होता. दुर्देवाने हा सामना मुंबई इंडियन्स संघाने २ धावांनी गमावला होता.

मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ५ वेळेस जेतेपद पटकावले आहे. या पाचही वेळेस जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने आयपीएल कारकिर्दीत मुंबई संघासाठी एकूण ९२ सामने खेळले आहेत. यात ७.४१ च्या इकॉनॉमीने १०९ गडी बाद केले आहेत. आगामी हंगामात देखील मुंबई इंडियन्स संघासाठी जसप्रीत बुमराह महत्वाची भूमिका बजावताना दिसू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या –

नक्की असं घडलं काय की मार्नस लॅब्युशेनने घेतलेल्या त्या झेलावर झाला मोठा वाद, घ्या जाणून 

…जेव्हा दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू करतात चार्ली चॅप्लिनची नक्कल, पाहा धमाल व्हिडिओ

“मुंबई इंडियन्स विरूद्ध सलामीच्या सामन्यात ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह उतरेल आरसीबीचा संघ”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---