---Advertisement---

अजबच आहे बाबा! बुमराहने स्टंपवरील बेल्स उडवल्या तरी स्मिथला तपास नाही, पाहा व्हिडिओ

On: सोमवार, डिसेंबर 28, 2020 5:26 PM
---Advertisement---

मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारताने सामन्यावर मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ६ बाद १३३ धावा आहेत आणि त्यांनी केवळ २ धावांचीच आघाडी घेतली आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ या डावातही मोठ्या धावा करण्यात यशस्वी ठरला नाही. तो केवळ ८ धावा करुन बुमराच्या गोलंदाजीवर विचित्र पद्धतीने बाद झाला. मात्र सध्या त्याच्या विकेटची जोरदार चर्चा सुरु आहे.

झाले असे की ३३ व्या षटकात बुमराह गोलंदाजी करत होता. बुमराहने टाकलेल्या या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्मिथने फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी बुमराहने वेगाने टाकलेल्या या चेंडूने लेग स्टंपवरील बेल्सला स्पर्श केला, त्यामुळे ती बेल्स खाली पडली. पण स्मिथच्या मात्र बेल्स पडल्याचे लक्षातच आले नाही. त्याने तो चेंडू यष्टीरक्षक रिषभ पंतने पकडला नसल्याचे पाहून एकेरी धाव घेण्यासाठी धावला.

विशेष म्हणजे त्यावेळी कोणालाच नक्की काय झाले हे कळाले नव्हते. बुमराहनेही पायचीतसाठी अपील केले. मात्र त्याचवेळी रहाणेने लक्षात आणून दिले की स्टंपवरील बेल्स पडली आहे. त्यामुळे भारतीय संघाने जल्लोष करायला सुरुवात केली. तसेच एकदा खात्रीसाठी रिप्लेही पाहण्यात आला, पण, अखेर स्मिथ त्रिफळाचीत झाला असल्याचे दिसल्याने त्याला बाद देण्यात आले.

स्मिथ या सामन्यात पहिल्या डावात शुन्यावर बाद झाला होता. खास गोष्ट अशी की यावेळी स्मिथची बॅट भारताविरुद्ध शांत राहिली आहे. त्याने या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातही पहिल्या डावात १ आणि दुसऱ्या डावात नाबाद १ धाव केली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

कोहली-स्मिथच्या फलंदाजीला विसाव्या वर्षाचं ग्रहण; दोघांनीही केलाय ‘हा’ नकोसा विक्रम

‘दादा’ फसला की, त्याचे खापर फोडायचे ‘नगमा’वर आणि त्याच्यापाठीमागे होतं ‘हे’ विशेष कारण

दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकल्यावर विराटने दिली प्रतिक्रिया! पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---