भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आशिया चषक खेळू शकला नाही. आशिया चषकाच्या संघातून बुमराहचे नाव वगळले गेल्यामुळे चाहत्यांची चांगलीच निराशा झाली होती. बुमराहच्या दुखापतीकडे पाहता असेही सांगितले जात होते की, आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी तो पुनरागमन करेल, याची कसलीही खात्री देता येणार नाही. असे असले तरी, आता त्याच्या फिटनेसविषयी चांगली बातमी समोर आली आहे.
माध्यामांतील वृत्तानुसार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लवकरच दुखापतीतून सावरू शकतो. माहितीनुसार तो आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी मैदानात पुन्हा गोलंदाजी करताना दिसू शकतो. टी-20 विश्वचषकापूर्वी भारताला ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघाविरुद्ध मालिका खेळायच्या आहेत. या दोन्हीपैकी एका मालिकेत तो पुनरागमन करेल, असे बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले.
बीसीसीआय अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, “बुमराहच्या फिटनेसमध्ये सुधारणा होत आहे आणि फिजिओ सतत त्याच्या संपर्कात आहेत. तो एनसीएमध्ये नाहीये, पण फिजिओ त्याच्यावर लक्ष ठेऊन आहेत. आम्हाला आशा आहे की, तो ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध पुनरागमन करेल. टी-20 विश्वचषकात त्याचे पुनरागमन नक्कीच होईल, परंतु त्याविषयी अत्ताच काही सांगणे जरा घाईचे होईल. बुमराह त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे मागच्या मोठ्या काळापासून मैदानाबाहेर आहे. जाणकारांच्या मते त्याच्या असामान्य गोलंदाजीमुळे (ऍक्शनमुळे) त्याला वारंवार दुखापत होत आहे. यावेळी वाटले होते की, तो यातून सावरला आहे, पण दुखापतीमुळे त्याला पुन्हा घेरले.”
“बुमराहविषयी सध्या काहीही बोलने योग्य असणार नाही. तो फिट झाल्यानंतर आम्ही पर्यायी खेळाडूंविषयी चर्चा करू, पण तो सध्या फिट नाहीये. आम्हाला अपेक्षा आहे की, तो पूर्ण पुन्हा संघात येईल, पण निश्चितपणे सांगता येणार नाही की, तो फिटनेस टेस्ट पास करेलंच. कोणत्याही परिस्थितीत टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्याच्यासोबत घाईगडबड करता येणार नाही. टी-20 विश्वचषकाला अजून वेळ आहे आणि पुढे काय होते, हे पाहू,” असेही अधिकारी पुढे बोलताना म्हणाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
हाँगकाँगला भिडण्याआधी भारतीय खेळाडूंची खास समुद्रीसफर, फोटो एकदा बघाच
अफगाणिस्तानच्या कुठल्याच खेळाडूला जमलं नाही ते राशिदने केलं, बनला टी-20 क्रिकेटमधला महान गोलंदाज
‘मध्यंतरी मी मेल्याच्याही बातम्या आल्या होत्या…’, पत्रकाराला मिळाले भारतीय खेळाडूकडून भन्नाट उत्तर