---Advertisement---

BREAKING: चार महिन्यांनी बूम बूम बुमराहचे कमबॅक; श्रीलंकेविरुद्ध उतरणार मैदानात

On: मंगळवार, जानेवारी 3, 2023 4:00 PM
Jasprit-Bumrah
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघासाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. बीसीसीआयने मंगळवारी (3 जानेवारी) त्यांचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन करणार असल्याचे सांगितले आहे. श्रीलंका संघ सध्या तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. उभय संघांतील वनडे मालिकेसाठी बुमराह भारतीय संघासोबत जोडला गेला आहे.

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सप्टेंबर 2022 पासून क्रिकेटच्या मैदानातून बाहेर आहेत. पाठिच्या दुखापतीमुळे बुमराह मोठ्या काळापासून संघातून बाहेर आहे. सप्टेंबर 2022 आधीही बुमराह वारंवार संघातून बाहेर राहिला होता. अशात चाहते त्याला पुन्हा खेळण्यासाठी भारतीय संघाच्या जर्सीत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दुखापतीमुळे बुमराह मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकात देखील खेळू शकला नव्हता. दरम्यानच्या काळात बुमराहने स्वतःच्या फिटनेसवर काम केले आणि पूर्णपणे फिट देखील झाला. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याने फिटनेस टेस्ट पास केली आहे आणि लवकरच संघात पुनरागमन करणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका मंगळवारी (3 जानेवारी) सुरू होणार असून उभय संघांतील वनडे मालिका 10 जानेवारी रोजी खेळला गेला. उभय संघांतील वनडे मालिकेसाठी बुरमहा भारतीय संघाचा भाग असणार आहे.  बुमराहची फिटनेसची कुठली तक्रार नसल्यास त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही संधी मिळेल, यात शंका नाही. दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील पुनरागमन करणार आहेत. रोहित दुखापतीमुळे टी-20 मालिकेत खेळत नाहीये, तर विराटला निवडकर्त्यांनी टी-20 मालिकेतून विश्रांती दिली आहे

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह , मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग. (Jasprit Bumrah included in ODI squad for Sri Lanka series)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता थांबायचं नाय! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ‘हा’ पठ्ठ्या करणार पदार्पण? ईशान असेल बॅकअप
INDvsSL | हार्दिकच्या नेतृत्वात नव्या कॅम्बिनेशनसह उतरणार भारतीय संघ, पाहा संभावित प्लेइंग 11

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---