दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आज (२३ एप्रिल ) मुंबई इंडियन्स संघाचा सामना पंजाब किंग्ज संघासोबत रंगणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्हीही संघ कसून सराव करत आहेत. तसेच या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन हीने एक फोटो शेअर केला होता. ज्यावर जसप्रीत बुमराहने प्रतिक्रीया देत आपले प्रेम जाहीर केले आहे.
संजना गणेशन ही सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असते. ती काही-ना काही शेअर करत आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. आता तिने शेअर केलेल्या प्रत्येक पोस्टवर जसप्रीत बुमराह आपली प्रतिक्रिया देत आपले प्रेम व्यक्त करत असतो. अशातच तिने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने आकाशी आणि काळया रंगाचे वस्त्र परिधान केले आहे.
https://www.instagram.com/p/CN-NPcNprIf/?igshid=1aadf54pm726z
यावर तिने कॅप्शन म्हणून लिहिले आहे की, ‘चांगला प्रकाश शोधा आणि चांगले फोटोज् घ्या.’ संजनाने शेअर केलेल्या या पोस्टवर जसप्रीत बुमराहने हार्टचा ईमोजी शेअर करत आपले प्रेम व्यक्त केले आहे. तसेच अनेक चाहते देखील या अप्रतिम फोटोवर आपल्या प्रतिक्रीया देत आहेत.

या दोघांनी गोवा येथे १५ मार्च रोजी विवाह केला होता. तसेच १५ एप्रिल रोजी या दोघांना विवाह करून एक महिना पूर्ण झाला होता. याच खास क्षणी संजनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जसप्रीत बुमराहसोबतचा केक कापत असतानाचा एक फोटो शेअर केला होता. ज्यावर तिने कॅप्शन म्हणून लिहिले होते की, ‘पती आणि केकला थोड जास्तच मिस करत आहे.’ तसेच चाहत्यांनी देखील दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

विवाह झाल्यानंतर, जसप्रीत बुमराह आता आयपीएल २०२१ स्पर्धेत मुंबई संघासाठी आपले कर्तव्य बजावत आहे .तर संजना देखील स्टार स्पोर्ट्स चॅनलवर प्रेसेंटरची भूमिका पार पाडत आहे. संजनाने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा शो ‘केकेआर डायरिज’मध्ये देखील होस्ट म्हणून काम केले आहे. तसेच २०१४ मध्ये तिने ‘मिस इंडिया शो’मध्ये अंतिम फेरी गाठली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
वडिलांच्या निधनांतरही खेळली होती आयपीएल, मुंबईविरुद्ध ‘या’ धाकड फलंदाजाला आजमावणार पंजाब?
मुंबई-पंजाबसमोर विजय मार्गावर परतण्याचं आव्हान; ‘अशी’ असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन?
लिलावात नाकारलं तरी मॅक्लेनघनचा इमान मुंबईपाशी, संघ अखेरच्या स्थानी राहिल्यास विकणार सर्व साहित्य






