मंगळवारी न्यूझीलंड विरुद्ध भारत संघातील वनडे मालिकेतील शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात भारताला 5 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही भारतीय संघाला न्यूझीलंडने 3-0 अशा फरकाने व्हाईटवॉश दिला.
या संपूर्ण मालिकेत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विकेट घेण्यात अपयश आले. त्याने या मालिकेतील 3 सामन्यात मिळून 30 षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्याने 1 षटक निर्धाव टाकले आणि 5.56च्या इकोनॉमी रेटने 167 धावा दिल्या. त्याच्या कारकिर्दीत असे पहिल्यांदाच झाले की त्याने वनडे मालिकेत एकही विकेट घेतली नाही.
त्याच्या या कामगिरीनंतर भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने म्हटले आहे की बुमराहने आता अधिक आक्रमक व्हायला हवे, कारण फलंदाज त्याच्या विरुद्ध बचावात्मक पवित्रा घेतात.
झहीर क्रिकबझशी बोलताना म्हणाला, ‘जेव्हा तूम्ही जसप्रीत बुमराहसारखा सन्मान मिळवता तेव्हा तूम्हाला या गोष्टींचा सामना करावा लागतो. बुमराह आत्ता अशा स्थितीत आहे की प्रतिस्पर्धी संघ त्याच्याविरुद्ध एकही विकेट न देता जरी 35 धावा निघाल्या तरी खुश आहेत. कारण त्यांना दुसऱ्या गोलंदाजांवर आक्रमण करता येते.’
तसेच पुढे झहीर म्हणाला, ‘बुमराहला आता समजले पाहिजे की त्याला विकेट घेण्यासाठी अधिक आक्रमक व्हावे लागेल. कारण त्याला माहित आहे की फलंदाज त्याच्याविरुद्ध बचावात्मक खेळणार आहेत. त्यामुळे त्याला आता फलंजदाजाने एखादी चूक करण्याची वाट बघत बसण्यापेक्षा विकेट घेण्यासाठी मार्ग शोधले पाहिजे.’
तसेच जहीर म्हणाला, ‘हे चांगले संकेत आहेत की अन्य फलंदाज त्याला इतका सन्मान देत आहेत. त्याचमुळे बुमराहचे काम आहे की आता फलंदाजांना खेळण्यासाठी उकसवणे. बुमराहने आता फलंदाजांवर दबदबा निर्माण केला पाहिले.’
बुमराहला न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतील खराब कामगिरीमुळे वनडेच्या गोलंदाजी क्रमवारीतील अव्वल स्थानही गमवावे लागले आहे. तो आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. तर अव्वल क्रमांकावर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट विराजमान झाला आहे.
"आळशी आहे टीम इंडिया, कशी जिंकणार वर्ल्डकप", माजी कॅप्टनचे खळबळजनक भाष्य
वाचा????https://t.co/EMeWjH9WNP????#म #मराठी #Cricket #TeamIndia #auswvindw— Maha Sports (@Maha_Sports) February 13, 2020






