भारताचा महत्वाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे एशिया कप (Asia Cup) स्पर्धेच्या बाहेर आहे. त्याला इंग्लंड दौऱ्यात पाठीला दुखापत झाली होती. यामुळेच तो मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात खेळला नाही. त्याचबरोबर हर्षल पटेल हा देखील दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. ते दोघेही एशिया कपमध्ये नाही खेळणार यामुळे भारतीय चाहत्यांना धक्का बसला. तर आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे, बुमराह लवकरच भारतीय संघात परतणार आहे, असे त्याने स्वत:च स्पष्ट केले आहे. तर पटेलही त्याच तयारीत आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने भारतीय संघात परण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी (एनसीए), बंगळुरू येथे रिहॅबिलिटेशन पूर्ण करत आहे. त्याच्याशी निगडीत व्हिडिओ त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला आहे.
या व्हिडिओला बुमराहने ‘कोणतेही संकट मोठे नाही’, असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओमध्ये बुमराह कसून सराव करताना दिसत आहे. तो गोलंदाजीतही कौशल्य दाखवत आहे. त्याचा हा सराव पाहून तो लवकरत मैदानावर परतणार याची चिन्हे दिसत आहेत.
भारतीय संघ एशिया कपनंतर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामने खेळणार आहेत. त्यानंतर टी२० विश्वचषक सुरू होणार आहे. अशात भारतीय संघाची बुमराहने लवकरात लवकर ठीक होण्याची आशा आहे.
View this post on Instagram
बुमराह हा टी२०मध्ये भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने २०१६ला टी२०मध्ये पदार्पण करताना ५८ सामन्यांत ६९ विकेट्स घेतल्या आहेत. तो युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांच्यानंतर भारताकडून सर्वाधिक टी२० विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज आहे. चहलने ७९ आणि भुवनेश्वरने ७२ विकेट्स घेतल्या आहेत.
दुखापतीपूर्वी बुमराहने इंग्लंडच्या दौऱ्यात बर्मिंघम कसोटीत संघाचे नेतृत्व केले होते. त्या सामन्यात त्याने ५ विकेट्स घेत नाबाद ३१ धावाही केल्या होत्या. तसेच त्याने स्टुअर्ट ब्रॉड याच्या एका षटकात २९ धावा केल्या होत्या ते कसोटी इतिहासातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठे षटक ठरले.
बुमराहबरोबरच एशिया कपमध्ये हर्षल पटेल हा पण खेळणार नाही. तो देखील बरगड्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. तसेच तो देखील एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन पूर्ण करत आहे.
हर्षलने देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेयर केला आहे. यामध्ये तो बुमराहप्रमाणेच चांगलाच सराव करताना दिसत आहे.
View this post on Instagram
हर्षलने २०२१मध्येच भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पदार्पण केले आहे. तसेच तो देखील इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाचा भाग होता. त्याने तिन्ही टी२० सामन्यांत खेळताना ४ विकेट्स घेतल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आता आयपीएल तेव्हाच खेळेल, जेव्हा…’; बेन स्टोक्सने केले महत्वाचे विधान
काय गोलंदाजी केलीस भावा? सगळेच फलंदाज शून्यावर बाद, १५ चेंडूत पालटला सामना
नातं तुटल्याच्या चर्चांनंतर एका महिन्यासाठी धनश्री जातेय माहेरी! ऐकून चहलने दिली अशी प्रतिक्रिया





