भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आगामी टी-20 विश्वचषकात खेळू शकणार नाहीये. दुखापतीमुळे आधी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली होती. पण बीसीसीआयने सोमवार, 3 ऑक्टोबर रोजी आगामी विश्वचषक स्पर्धेत देखील उपस्थित नसेल, याची पुष्टी केली. विश्वचषकात खेळता येणार नसल्यामुळे बुमराह स्वतः देखील नाराज आहे. त्याने सोशल मीडियावर ही नाराजी व्यक्त केली आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने अधिकृत ट्वीटर खात्यावरून पोस्ट शेअर करत ही नाराजी व्यक्त केली आहे. त्याने ट्वीटमध्ये लिहिले की, “मी यामुळे नाराज आहे की, यावर्षी टी-20 विश्वचषकात मी खेळू शकणार नाही. पण माझ्या खास लोकांकडून मिळालेल्या शुभेच्छा, काळजी आणि आणि पाठिंबा देण्यासाठी आभारी आहे. मी ठीक झाल्यानंतर लगेच, ऑस्ट्रेलियातील संघाच्या अभियानाला पाठिंबा द्यायला सुरुवात करेल.”
I am gutted that I won’t be a part of the T20 World Cup this time, but thankful for the wishes, care and support I’ve received from my loved ones. As I recover, I’ll be cheering on the team through their campaign in Australia 🇮🇳 pic.twitter.com/XjHJrilW0d
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) October 4, 2022
जसप्रीत बुमराहच्या या पोस्टवर बीसीसीआयची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. बीसीसीआयने ही पोस्ट रिट्वीट करत लिहिले की, “आमचा स्पीडस्टार लवकरच ठीक होईल.”
Speedy recovery to our speedster @Jaspritbumrah93. #TeamIndia https://t.co/yTAntSdDXl
— BCCI (@BCCI) October 4, 2022
मागच्या महिन्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला होता. जसप्रीत बुमराहने या मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन केले होते. मालिकेतील शेवटच्या दोन सामन्याततो खेळला आणि एक विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवडकर्त्यांनी त्याला संघात सामील केले होते, परंतु दुखापतीच्या कारणास्तव त्याने या मालिकेतून माघार घेतली. ऑस्ट्रेलियन संघ भारतात येण्यापूर्वी बुमराहने मोठी विश्रांतू घेतली होती. दुखापतीच्याचा करणास्तव तो आशिया चषकात खेळू शकला नव्हता.
आगामी टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने बुमराह भारतीय संघासाठी सर्वात महत्वाचा गोलंदाज होता, पण त्यानेच माघार घेतल्यामुळे संघात याचा नक्कीच तोटा होऊ शकतो. विश्वचषक स्पर्धा 16 ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून भारताला पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. बुमराह जरी संघासोबत नसला, तरी त्याच्या बदली खेळाडूच्या रुपात अनेक पर्याय संघाकडे उपलब्ध आहेत. मोहम्मद शणी, मोहम्मद सिराज आणि दीपक चाहर या नावांची चर्चा प्रामुख्याने होत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ढगाळ वातावरणात खेळला जाणार तिसरा टी-20 सामना, वाचा पावसाविषयीचा अंदाज
महिला टी20 विश्वचषक 2023 चं वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये