भारतीय संघाचा श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेआधी मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, फिटनेसच्या कारणास्तव या मालिकेत देखील खेळू शकणार नाहीये. श्रीलंकेविरुद्धचा पहिला वनडे सामना 10 जानेवारी (मंगळवार) रोजी गुवाहाटीमध्ये खेळला जाणार असून बुमराहा मात्र या सामन्यासातून माघात घेत आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघ 2-1 अशा अंतराने विजयी झाला. पाहुण्या श्रीलंका संघाचे या मालिकेतील प्रदर्शन पाहता वनेड मालिका जिंकणे भारतासाठी नक्कीच सोपे नसेल. बीसीसीआयने जेव्हा श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघ घोषित केला, तेव्हा त्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हे नाव सामील केले गेले नव्हते. मात्र 29 डिसेंबर रोजी एनसीएने बुमराहला फिट घोषित केल्यानंतर बुमराहला वनडे मालिकेसाठी संघात सामील केले. चाहते त्याला मोठ्या काळानंतर मैदानात खेळताना पाहण्यासाठी उत्सुक होते, मात्र असातच सोमवारी (9 जानेवारी) चाहत्यांची निराशा करणारी बातमी समोर आली.
NEWS – Jasprit Bumrah ruled out of 3-match #INDvSL ODI series.
More details here – https://t.co/D45VColEXx #TeamIndia
— BCCI (@BCCI) January 9, 2023
गुवाहाटी वनडे सामन्यातून संघात पुनरागमन करण्यासाठी तयार असलेल्या बुमराहाला अजून काही दिवसांचा वेळ गरजेचा आहे, असे बीसीसीआयने सांगितले. आगामी काळात भारतीय संघाला काही महत्वाच्या मालिका आणि वनडे विश्वचषक खेळायचा आहे. या सर्व मालिकांमध्ये बुमराहची फिटनेस संघासाठी महत्वाची असणार आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआय आणि संघाची निवड समिती यांनी बुमराला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. (Jasprit Bumrah ruled out of 3-match ODI series Against Sri Lanka)
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी श्रीलंका संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कॉलेजला गेलो नाही, पण…’, शिक्षण व्यवस्थेविषयी धोनीने स्पष्ट भूमिका
‘मी काय करतोय, हे मला माहितीये…’, पाहा पत्रकाराच्या कोणत्या प्रश्नावर भडकला बाबर आझम