नॉटिंघम| भारतीय क्रिकेटप्रेमींच्या नजरा सध्या आगामी कसोटी मालिकेवर आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ ४ ऑगस्टपासून इंग्लंड संघाशी दोन हात करणार आहे. तर ८ ऑगस्ट रोजी हा सामना संपणार आहे. अवघ्या एका दिवसांवर आलेल्या या सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू कसून मेहनत घेताना दिसत आहेत. अशात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने अनोखा सराव करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुमराहचा सराव करतानाचा फोटो ट्विटर हॅन्डलवर शेअर केला आहे. या फोटोत बुमराह त्याच्या शैलीत कसून गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. मात्र यावेळी चक्क पायांवर फलंदाजीचे पॅड्स घालत तो सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे.
यावर बीसीसीआयनेही त्याची पाठराखण केली आहे. ‘आज त्याचे सराव सत्र खूपच व्यस्त राहिले आहे,’ असे मजेशीर कॅप्शन बीसीसीआयने दिले आहे. यावर चाहत्यांनीही प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.
He is having a really busy session in the nets. 😁#TeamIndia #ENGvIND pic.twitter.com/a4qsw7p8KY
— BCCI (@BCCI) August 1, 2021
Koi batayega ye pad pahan ke bowling kyo kr rha h
— Aman shrivastava 🇮🇳 (@im___Aman) August 1, 2021
https://twitter.com/ammar_vk/status/1421875027390042116?s=20
इंग्लैंड में यदि टेस्ट मैच जीतना है तो @Jaspritbumrah93 को भी अच्छी बैटिंग करनी पड़ेगी…. 😍😍
और बुमराह को बैटिंग प्रैक्टिस करवाने के लिए किसी और बॉलर पर भरोसा नहीं है..😜
इसलिए….. #BowlerBumrah vs #BatsmanBumrah#TeamIndia pic.twitter.com/mMx87ciRtM— आकाश कुकरेती (@rudrakash54) August 2, 2021
बुमराहकडे कसोटी विकेट्सची शंभरी पूर्ण करण्याची संधी
भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज बुमराह सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध तो सपशेल फ्लॉप ठरला होता. मात्र आता इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी करत पुन्हा एकदा आपल्यातील प्रतिभा सिद्ध करण्याची संधी त्याच्याकडे असणार आहे. या कसोटी मालिकेत मोठी किर्तीमान करण्याची संधीही त्याच्याकडे असणार आहे. तो कसोटी स्वरुपातील आपल्या १०० विकेट्स पूर्ण करण्यापासून केवळ १७ विकेट्सने दूर आहे. आतापर्यंत त्याने २० कसोटी सामने खेळताना एकूण ८३ विकेट्स घेतल्या आहेत.
याबरोबरच १०० विकेट्स पूर्ण केल्यानंतर तो कपिल देव यांचा सर्वात जलद कसोटी विकेट्सचे शतक पूर्ण करण्याचा विक्रम मोडू शकतो. कपिल देव यांनी २५ कसोटी सामन्यांमध्ये १०० विकेट्स पूर्ण केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
अतिउत्तम! ‘या’ देशाचे क्रिकेटरही खेळणार आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात, भारतासोबतच धरणार युएईची वाट
मयंक पहिल्या कसोटीतून बाहेर, सलामीसाठी ‘हे’ ३ पर्याय उपलब्ध; एक नाव अनपेक्षित
‘येथे जिंकण्याव्यतिरिक्त काहीही नको’, इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे विराटने फुंकले रणशिंग