इंडियन प्रीमीयर लीग(आयपीएल) मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर(आरसीबी) संघाने त्यांच्या नवीन लोगोचे काल(14 फेब्रुवारी) अनावरण केले आहे. या नवीन लोगोवर सोशल मीडियातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनेही आरसीबीच्या नवीन लोगोवर प्रतिक्रिया देताना त्यांना गमतीने ट्रोल केले आहे.
आरसीबीच्या या नवीन लोगोमध्ये त्यांचा प्रमुख लाल रंग बॅकग्राउंडला आहे. तसेच सोनेरी रंगाचा सिंह मागील 2 पायांवर उभा असून गर्जना करत आहे. त्याचबरोबर या सिंहाच्या मस्तकावर एक राजेशाही मुकुट आहे. तसेच या सिंहाचे पुढील दोन पाय वर उचलले आहेत. सिंहाच्याखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघाचे नाव लिहिलेले आहे.
आरसीबीने इंस्टाग्रमावर या लोगोसंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टवर बुमराहने प्रतिक्रिया दिली आहे की लोगोवरील सिंहाची ऍक्शन त्याच्या गोलंदाजीच्या ऍक्शनप्रमाणेच आहे. बुमराहने लिहिले आहे की ‘कूल लोगो. माझ्या गोलंदाजी ऍक्शनप्रमाणेच वाटत आहे.’
बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. तसेच तो सध्या भारतीय संघाबरोबर न्यूझीलंड दौऱ्यावर असून 21 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे.
मालकी सोडलेल्या मल्ल्याने अशी घेतली बेंगलोर संघाची फिरकी https://t.co/dWvRD97pxj#म #मराठी #Cricket #RCB #IPL2020 @RCBTweets
— Maha Sports (@Maha_Sports) February 15, 2020
एमएस धोनीच्या स्वागतासाठी चेन्नई सज्ज; तयार आहे खास प्लॅन
वाचा- ????https://t.co/KuMqyZRA0W????#म #मराठी #Cricket #TeamIndia @msdhoni @ChennaiIPL— Maha Sports (@Maha_Sports) February 15, 2020