साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच दिवशी चांगली कामगिरी केली आहे.
परंतू त्याचबरोबर जसप्रीत बुमराह आणि नो बॉलवरील विकेटचे सत्र चाहत्यांना या सामन्यातही पहायला मिळाले. त्याने पहिल्या डावातील पाचव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर इंग्लंड कर्णधार जो रुटला पायचीत बाद करण्यासाठी अपील केले होते.
परंतू पंचानी नाबाद ठरवले. त्यामुळे रुट बाद असल्याचा पूर्ण विश्वास असणाऱ्या बुमराहने भारताचा कर्णधार विराट कोहलीला डीआरएस घेण्यास सांगितले. पण यात बुमराहने नो बॉल टाकला असल्याचे आढळल्याने रुटला जीवदान मिळाले.
रुटला जीवदान मिळाल्याचा आनंद जास्त काळ घेता आला नाही कारण त्याला इशांत शर्माने आठव्या षटकात त्याला पायचीत बाद करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला.
मात्र बुमराहच्या या नो बॉलमुळे त्याला सोशल मिडियावर ट्रोल करण्यात आले आहे.
याआधीही अनेकदा बुमराहने महत्त्वाच्या क्षणी नो बॉलवर विकेट घेतली असल्याने चाहत्यांनी तेच सत्र चौथ्या कसोटीतही कायम राहिल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यानही चौथ्या दिवशी बुमराहने आदिल रशीदला बाद केलेला चेंडूही नो बॉल टाकला होता. त्यामुळे रशीदला जीवदान मिळाले होते. पुढे रशीदने 55 चेंडू खेळले तसेच सामना 5व्या दिवसापर्यंत नेला होता.
त्यामुळे बुमराहकडून सतत होणाऱ्या या नो बॉलच्या चुकीबद्दल त्याच्यावर टीका होत आहे.
Jasprit Bumrah is a fine cricketer, and in the middle of an excellent spell, but he is letting himself and his team down too often with these no-balls.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) August 30, 2018
Somebody make Jasprit Bumrah wear these shoes…😭#ENGvIND pic.twitter.com/IqKwnBuZtU
— Chinmay Jawalekar (@CricfreakTweets) August 30, 2018
Jasprit Bumrah and No Balls, The Untold story.😪🤧😏🤦🏻♂️
— Neel Patel (@NeelPatel189) August 30, 2018
https://twitter.com/rickypatel26/status/1035113132379832322
Ishant Sharma saves Jasprit Bumrah..
It was just similar kind of LBW, Bumrah missed due to his love for NO-BALL#ENGvIND
— Aman Bansal (@AmanBansal4u) August 30, 2018
https://twitter.com/iamtussi10/status/1035118896993452033
What Radhika apte is to @NetflixIndia ,No ball is to Jasprit bumrah #INDvENG
— 🩺 (@Pinacodalda) August 30, 2018
Jasprit Bumrah don't you feel ashamed of bowling no-balls?
Don't you learn from your mistakes??
Really pathetic man.
Kohli please don't take him to England for world cup. Can't see him bowling no ball and India losing final.. #ENGvIND
— Aman Bansal (@AmanBansal4u) August 21, 2018
"Who said No-balls are No-balls"
~Jasprit Bumrah~— Kuptaan 🇮🇳 (@Kuptaan) August 30, 2018
भारतीय गोलंदाजांनी चौथ्या कसोटीत पहिल्या डावात चांगली कामगिरी करताना 86 धावात इंग्लंडचे 6 फलंदाजांना बाद केले आहे. यात बुमराहने 2 विकेट्स घेतल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट कोहलीने क्षेत्ररक्षणातही केली दिग्गज खेळाडूंची बरोबरी
–एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघाने २० वर्षांनंतर केला अंतिम फेरीत प्रवेश
–पहिल्याच दिवशी काही मिनीटांत इशांतचा कसोटीत मोठा पराक्रम
– टाॅप ७- कारकिर्दीत १६० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारे खेळाडू