---Advertisement---

वाढदिवस विशेष- जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी

---Advertisement---

आज भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथचा ४९वा वाढदिवस. जवागल श्रीनाथचा जन्म ३१ आॅगस्ट १९६९ रोजी म्हैसुर, कर्नाटक येथे झाला.

९०च्या दशकात या खेळाडूने भारतीय गोलंदाजीची धुरा समर्थपणे वाहिली. त्याने भारताकडून खेळलेल्या ६७ कसोटीत २३६ विकेट्स आणि २२९ वनडेत ३१५ विकेट्स मिळवल्या आहेत.

सध्या तो आयसीसीचा सामनाधिकारी म्हणुन काम पहातो.

अशा या भारताच्या महान गोलंदाजाबद्दल माहित नसलेल्या काही मनोरंजक गोष्टी

१. श्रीनाथने हैद्राबाद संघाविरुद्ध १९८९ रोजी पदार्पणाच्या रणजी सामन्यातच पहिल्याच डावात हॅट्रिक घेतली होती. तसेच त्याने ८५ धावा देत या डावात ५ विकेट्स घेतल्या तर सामन्यात ७ विकेट्स घेत पदार्पण गाजविले.

२. भारताकडून वनडेत सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज आहे. त्याने वनडेत २२९ सामन्यात ३१५ विकेट्स घेतल्या आहे तर कुंबळेने वनडेत ३३४ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत ३०० विकेट्स घेणारा तो केवळ दुसरा भारतीय खेळाडू आहे.

३. श्रीनाथ हा मितभाषी आणि शांत स्वभावाचा खेळाडू म्हणुन ओळखले जायचे. तो कधीही कुणाला गोलंदाजी करताना खुन्नस देत नसे. वेलिंग्टन कसोटीत जेव्हा त्याने टाकलेला एक उसळता चेंडू स्टिफन फ्लेमिंगच्या हेल्मेटला लागला तेव्हा श्रीनाथ स्लेजिंग करत असल्याचे फ्लेमिंगला वाटले. त्यामुळे तो श्रीनाथ जवळ जाऊन हुज्जत घालायला लागल्यावर श्रीनाथने त्याला सांगितले की ‘मी तु ठीक आहे की नाही’ हे विचारत होतो.  हे दोन्हीही खेळाडू पुढे जागतिक क्रिकेटमध्ये एक आदर्श खेळाडू म्हणुन ओळखले गेले.

४. श्रीनाथने १९९९मध्ये पहिला विवाह केला परंतु पहिल्या लग्नानंतर काही वर्षांनी दोघांच्या संमतीने घटस्फोट घेतला. नंतर २००७मध्ये तो पत्रकार माधवी पत्रावलींबरोबर विवाहबंधनात अडकला.

५. केवळ श्रीनाथमुळे अनिल कुंबळे कसोटी डावात १० विकेट्स घेऊ शकला. झाले असे की पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात फिरोजशाह सुरु असलेल्या सामन्यात कुंबळेने ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्याला १० विकेट्सचा टप्पा पार करण्यासाठी केवळ १ विकेटची गरज होती. अशा वेळी जवागल श्रीनाथ दुसऱ्या बाजून गोलंदाजी करत होता. यावेळी आॅफ स्टंपच्या बाहेर मारा करत श्रीनाथने विकेट घेणे टाळले होते. नाहीतर कदाचीत हा विक्रम कधीच भारतीय खेळाडूच्या नावावर झाला नसता.

६. १९९१ला भारतीय संघात पदार्पण केलेल्या श्रीनाथने १९९२साली वर्षातील सर्वात्तम भारतीय क्रिकेटरचा पुरस्कार मिळवला होता.

७. क्रीडा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्टेचा समजल्या जाणाऱ्या अर्जून पुरस्काराने १९९६मध्ये श्रीनाथला सन्मानित करण्यात आले.

https://twitter.com/BCCI/status/373714080319557632

८. २००३मध्ये शेवटचा सामना खेळलेल्या श्रीनाथने २००६मध्ये पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये काम करायला सुरुवात केली परंतु यावेळी जबाबदारी वेगळी होती. यावेळी त्याने आयसीसी सामनाधिकारी म्हणुन काम पाहण्यास सुरुवात केली. त्याने तब्बल ३२१ सामन्यात सामनाधिकारी म्हणुन काम पाहिले आहे. आजपर्यंत केवळ ५ भारतीयांनी ही जबाबदारी पार पाडली आहे.

९. श्रीनाथने म्हैसुरच्या एका महाविद्यालयातून इंजिनीयरिंगचे शिक्षण पुर्ण केले आहे.

१०. श्रीनाथला क्रिकेट जगतात म्हैसुर एक्सप्रेस म्हणुन ओळखले जाते.

११. श्रीनाथने २००२साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली परंतु तेव्हाच कर्णधार असलेल्या गांगुलीने त्याला २००३चा विश्वचषक खेळण्याची विनंती केली.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

टाॅप ४- जसप्रीत बुमराहचे ते ४ नो बाॅल आणि इतिहास…

 ५२६ कसोटी सामन्यांत टीम इंडियाकडून पहिल्यांदाच असे घडले

 अश्विन चौथ्या कसोटीत चमकला, कुंबळे- भज्जीच्या यादीत सामील

 तिसरी कसोटी: खराब सुरुवातीनंतर सॅम करनने इंग्लंडला सावरले

एशियन गेम्स: भारताला महिलांच्या थाळीफेक तसेच 1500मीटर शर्यतीत कांस्यपदक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment