नवी दिल्ली| भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू जवागल श्रीनाथने माजी कर्णधाक एमएस धोनीला क्रिकेटमधील योग्यासारखे म्हटले आहे. श्रीनाथ याचा असा विश्वास आहे की धोनी योग्य वेळी निकालापासून स्वत:ला वेगळा करू शकतो आणि यामुळेच तो एखाद्या योगी प्रमाणे आहे.
धोनी आपल्या भावना व्यक्त करत नाही. तो शांतपणे आपले काम करत राहतो. माजी भारतीय कर्णधाराची हीच गुणवत्ता श्रीनाथला सर्वाधिक प्रभावित करते. जेव्हा सर्व काही योजनानुसार सुरू नसते तेव्हा दबावात शांतता आणि धैर्य ठेवण्याच्या धोनीच्या क्षमतेबद्दलही तो खूप प्रभावित झालो.
विजय आणि पराभव या दोन्ही परिस्थितीमध्ये माणसाने कसे वागावे याचे एक उदाहरण धोनीने मांडले आहे आणि या गुणवत्तेमुळेच कोट्यावधी भारतीयांचा सन्मान त्याला मिळतो, असा श्रीनाथचा विश्वास आहे.
आर अश्विनशी झालेल्या संभाषणात श्रीनाथ म्हणाला, “एमएस धोनी क्रिकेटमधील योगीसारखा आहे. तो खेळाला ज्या प्रकारे समजतो, तो स्वत: ला निकालांपासून कसे दूर ठेवतो. विजयानंतर तो स्वत:ला कसा सादर करतो, ज्या प्रकारे तो ट्रॉफी पकडतो, सर्वात मौल्यवान ट्रॉफीदेखील तो दुसऱ्याकडे सोपवितो आणि वेगळा होतो.”
महत्त्वाच्या बातम्या –
शोएब अख्तरची ‘या’ खेळाडूवर कडाडून टीका; म्हणाला, तो हरवलेल्या गायीसारखा…
किंग्स इलेव्हन पंजाबसाठी आनंदाची बातमी; हा गोलंदाज गाजवतोय सीपीएल
‘मिस्टर ३६०’ एबी डिलिवियर्सने केली आयपीएलच्या तयारीला सुरुवात; पहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख –
रंगअंधत्व असतानाही मोठी कारकिर्द घडवणाऱ्या ख्रिस राॅजर्सबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?
भल्याभल्या गोलंदाजांना धूळ चारणाऱ्या रोहितची फलंदाजी ‘या’ ४ गोलंदाजांपुढे पडते फिकी