fbpx
Saturday, January 23, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रंगअंधत्व असतानाही मोठी कारकिर्द घडवणाऱ्या ख्रिस राॅजर्सबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?

Interesting facts about Chris Rogers

September 1, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ICC

Photo Courtesy: Twitter/ICC


ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंनी आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर असताना निवृत्ती घेतलेली दिसून येते.‌ मायकेल बेवन, ग्लेन मॅकग्रा, सायमन कॅटीच, मायकल क्लार्क, मिचेल जॉन्सन अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहता येतील. याचप्रमाणे, अजून एक खेळाडू सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये असताना, कसोटी क्रिकेट गाजवताना अचानक निवृत्त झाला. तो खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू व सलामीवीर ख्रिस रॉजर्स.

याच ख्रिस रॉजर्सविषयी काही रंजक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१) ख्रिस रॉजर्स याला संघ सहकारी “बकी” या टोपण नावाने हाक मारत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात जवळपास सर्वच खेळाडूंची टोपण नावे असत. रिकी पॉंटिंग ला “पंटर”, ग्लेन मॅकग्रा याला “पिजन”, ब्रेट लीला “बिंगा” तर मायकल क्लार्कला “पप” या नावाने ओळखले जाते.

२) रॉजर्स याला रंगअंधत्वाचा आजार होता. आपली संपूर्ण कारकीर्द तो रंगअंधत्व असताना खेळला.

३) रॉजर्स तब्बल चार काउंटी संघांकडून खेळला आहे. डर्बीशायर, नॉर्दम्पटनशायर, लिसेस्टरशायर व मिडलसेक्स या चार काउंटी संघाचे त्याने प्रतिनिधीत्व केले आहे. विशेष म्हणजे, या चारही संघांकडून त्याने द्विशतक झळकावण्याची कामगिरी केली होती.

४) २००५ मध्ये लिसेस्टरशायर कडून खेळताना, आपल्याच देशाविरुद्ध म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते.

५) २००८ मध्ये भारताविरुद्ध पर्थ कसोटीत त्याने पदार्पण केले. त्यावेळी तो वयाची तिशी पार करून गेला होता. कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणारा तो ३९९ वा खेळाडू ठरला.

६) भारताविरुद्ध पदार्पण केल्यानंतर त्याला पुन्हा संधीसाठी पाच वर्षे वाट पहावी लागली. २०१३ च्या ऍशेजसाठी त्याचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आला होता.

७) रॉजर्स पदार्पणापासून सलग ४५ कसोटी डाव शून्यावर बाद झाला नव्हता. त्याला पहिल्यांदा शून्यावर बाद करण्याची किमया इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने केली.

८) रॉजर्सच्या कारकीर्दीतील सर्वोच्च खेळी (१७३) ही त्याच्या अखेरच्या मालिकेत आली. २०१५ ऍशेज दरम्यान त्याने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर ही खेळी साकारली होती.

९) सलग सात सामन्यात अर्धशतक झळकावून बाद होणारा तो पाचवा फलंदाज होता. त्याने या सर्व सामन्यात अर्धशतकाची वेस ओलांडली मात्र, त्याला शतक करता आले नाही.

१०) राॅजर्स ऑस्ट्रेलियाकडून २५ कसोटी सामने खेळू शकला. यात त्याने ४२.८७ च्या सरासरीने २,०१५ धावा काढल्या. त्याच्या ५ नावे आंतरराष्ट्रीय शतके आहेत. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ३१३ सामने खेळून त्याने २५,४७० धावा काढताना तब्बल ७६ शतके झळकावली आहेत.

ट्रेंडिंग लेख –

भल्याभल्या गोलंदाजांना धूळ चारणाऱ्या रोहितची फलंदाजी ‘या’ ४ गोलंदाजांपुढे पडते फिकी

भारतीय ३ विकेटकिपर, जे आयपीएलमध्ये ठरलेत सुपर किंग

तुटपूंज्या किंमत मिळूनही ‘हे’ ५ खेळाडू ठरले आयपीएलमध्ये सुपर डुपर हिट

महत्त्वाच्या बातम्या –

मैदानावर उतरताच ‘हा’ खेळाडू म्हणतोय, आता तुरुंगातून सुटल्यासारखे वाटत आहे…

शोएब अख्तरची ‘या’ खेळाडूवर कडाडून टीका; म्हणाला, तो हरवलेल्या गायीसारखा…

किंग्स इलेव्हन पंजाबसाठी आनंदाची बातमी; हा गोलंदाज गाजवतोय सीपीएल


Previous Post

मैदानावर उतरताच ‘हा’ खेळाडू म्हणतोय, आता तुरुंगातून सुटल्यासारखे वाटत आहे…

Next Post

४ वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये ठोकलेत केवळ ४ शतके, पहा कोणत्या फलंदाजांनी केलाय हा पराक्रम

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ BCCI
क्रिकेट

पासा पलट गया! एकवेळ शास्त्रींना ट्रोल करणारे चाहतेच मागतायत त्यांची क्षमा, जाणून घ्या कारण

January 23, 2021
Photo Curtsey: Facebook/Bal Thackeray
क्रिकेट

गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची

January 23, 2021
Photo Curtsey: Twitter/BBL
क्रिकेट

चेन्नई सुपर किंग्स, याला संघात घ्या! अवघ्या ५१ चेंडूत शतक करणाऱ्या ‘त्या’ पठ्ठ्यासाठी नेटकऱ्यांची मागणी

January 23, 2021
Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

बाळासाहेबांचे क्रिकेट प्रेम! केवळ दहा मिनिटे सामना बघेन म्हणतं शेवटपर्यंत जागेवरुन हाललेही नाहीत

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

“वॉशिंग्टन सुंदरकडे ब्रिस्बेन कसोटीत खेळण्यासाठी पॅड्स नव्हते, मग..”, प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

January 23, 2021
क्रिकेट

ऑटोचालकाचा मुलगा ते बीएमडब्ल्यूचा मालक! मोहम्मद सिराजने स्वतःलाच गिफ्ट केली महागडी कार; पाहा फोटो

January 23, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ mipaltan

४ वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये ठोकलेत केवळ ४ शतके, पहा कोणत्या फलंदाजांनी केलाय हा पराक्रम

Photo Courtesy: Twitter/ ICC

धोनी क्रिकेटमध्ये एका योग्यासारखा, या भारतीय दिग्गजाने व्यक्त केले मत

Photo Courtesy: Twitter/ ICC

जर ही गोष्ट घडली नसती तर अँडरसनच्या आधीच 'या' ३ वेगवान गोलंदाजांनी घेतल्या असत्या कसोटीत ६०० विकेट्स

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.