टोकियो। शनिवारी (७ ऑगस्ट) भारतीय खेळाडू नीरज चोप्राने भालाफेकी खेळात ऑलिंपिक्स २०२० मध्ये देशाची मान उंचावली आहे. त्याने या खेळात दुसऱ्याच प्रयत्नात सर्वाधिक लांब म्हणजेच ८७.५८ मीटर अंतरावर थ्रो केला. यामुळे त्याने सुवर्ण पदक निश्चित केले आणि देशाला टोकियो ऑलिंपिक्समधील पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले. विशेष म्हणजे या कामगिरीमुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोबतच बक्षीसांचाही वर्षाव होत आहे.
या सुवर्ण कामगिरीनंतर नीरज चोप्राला आमच्या धोरणानुसार ६ कोटी रुपये आणि वर्ग १ श्रेणीची नोकरी दिली जाईल. आम्ही पंचकुलामध्ये खेळाडूंसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार आहोत, जिथे त्याला हवे असल्यास तो प्रमुख असेल, असे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. (Neeraj Chopra will be given Rs 6 crore & a class I category job as per our policy Says Haryana CM)
Neeraj Chopra will be given Rs 6 crore & a class I category job as per our policy. We will be building a Centre of Excellence for athletes in Panchkula, where he will be the head if he wants. He will be given a plot with 50% concession, like other players: Haryana CM ML Khattar pic.twitter.com/ZubViQdSQ1
— ANI (@ANI) August 7, 2021
याव्यतिरिक्त त्यांनी असेही म्हटले की, त्याला इतर खेळाडूंप्रणाणे ५० टक्के सवलतीसह भूखंडही दिला जाईल.
अशी केली ती ऐतिहासिक कामगिरी
पात्रता फेरीत ८६.६५ मीटर भालाफेक करून नीरज अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. अंतिम फेरीत तो दुसऱ्या स्थानावरून सुरुवात करत होता. त्याने आपल्या पहिल्या संधीमध्ये ८७.०३ मीटर भालाफेक करत आघाडी घेतली. दुसऱ्या संधीमध्ये त्याने आणखी सुधारणा करत ८७.५८ मीटर भाला फेकला. पहिल्या फेरीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या संधीमध्ये तो ७६.७९ मीटरची फेक करू शकला.
अंतिम आठमध्ये देखील तो अव्वल भालाफेकपटू म्हणून सहभागी झाला. तो अखेरच्या तीन संधीमध्ये त्याची पहिली फेक चुकीची ठरवण्यात आली. मनासारखी फेक न झाल्याने अंतिम फेरीतील दुसऱ्या संधीत त्याने फॉल थ्रो केला. सहाव्या आणि अखेरच्या संधीमध्ये ८४.०२ मीटरचा भाला त्याने फेकला. मात्र, त्याची दुसरी ८७.५८ मीटरची फेक त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यास पुरेशी होती.
नीरजविषयी थोडंसं
भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या नीरजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ५vमेगा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अभिमानास्पद! अभिनव बिंद्रानंतर ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोप्रा दुसराच भारतीय
-इतिहास घडला! भारताच्या नीरज चोप्राने मिळवले भालाफेकीत सुवर्णपदक