मंगळवारी (27 ऑगस्ट) जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. ते सध्या बीसीसीआयचे सचिव आहेत. शाह 1 डिसेंबर पासून आपला पदभार सांभाळतील.
आता जय शाह आयसीसीचे अध्यक्ष बनल्यानंतर बीसीसीआयमधील सचिवपदाची खूर्ची रिकामी झाली आहे. या पदासाठी 3 नाव शर्यतीत आहेत. आम्ही या बातमीद्वारे तुम्हाला अशा तीन नावांबद्दल सांगणार आहोत, जे जय शाह यांच्यानंतर बीसीसीआयचे सचिव बनू शकतात.
(3) राजीव शुक्ला – राजीव शुक्ला यांनी बीसीसीआयमध्ये आतापर्यंत अनेक पदं सांभाळली आहेत. ते आयपीएलचे अध्यक्षही राहिले आहेत. अशा परिस्थिती ते बीसीसीआयचे सचिव बनल्याच बोर्डाला त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल. राजीव शुक्ला सध्या बीसीसीआयचे उपाध्यक्ष आहेत. आता त्यांना सचिवपदाची खुर्ची मिळते की नाही, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
(2) अरुण धूमल – सध्या आयपीएलचे चेअरमन असलेले अरुण धूमल देखील बीसीसीआयचे सचिव होण्याच्या शर्यतीत आहेत. यापूर्वी ते बीसीसीआयचे कोषाध्यक्ष होते. त्यांच्या काम करण्याच्या स्टाईलची अनेकदा चर्चा होते. त्यांच्या कार्यकाळात आयपीएलला मोठा फायदा झाला आहे. जय शाह यांच्याशी देखील त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे सचिव पदासाठी त्यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे.
(1) रोहन जेटली – रोहन जेटली भाजपाचे दिग्गज दिवंगत नेते अरुण जेटली यांचे पुत्र आहेत. ते सध्या दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असून रिपोर्ट्सनुसार, ते सचिव पदाच्या शर्यतीती सर्वात आघाडीवर आहेत. मात्र रोहन जेटली यांनी दिल्ली क्रिकेट असोसिएशन सोडण्याच्या दाव्यांना खोडून काढलं होतं. आता ते बीसीसीआयचे सचिव बनतात की नाही, हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
हेही वाचा –
महिला, अपंग आणि कसोटी क्रिकेटमध्ये होणार मोठा बदल! ICC अध्यक्ष जय शहांची पहिली प्रतिक्रिया
जय शहा क्रिकेटमध्ये कसे आले? वयाच्या 21 व्या वर्षी कमावले नाव, पाहा रंजक प्रवास
संपुर्ण यादीः आयसीसीचे आजपर्यंतचे भारतीय प्रमुख, जय शहा सर्वात तरुण