Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आणखी एक वेगवान गोलंदाज, जो फलंदाजीही करू शकतो; ‘दुर्लक्षित’ उनाडकटची निवडकर्त्यांना कोपरखळी

November 13, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
Jaydev Unadkat

Photo Courtesy: Twitter/@BCCIDomestic


काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात काही खेळाडूंना संधी मिळाली, तर काही खेळाडूंना मिळाली नाही. भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनाडकटची भारतीय संघात निवड झाली नाही. त्याच्याकडे बीसीसीआय आणि निवडकर्त्यांनी पुन्हा एकदा दुर्लक्ष केले आहे. हा डावखुरा वेगवान गोलंदाज देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, परंतु न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका तसेच कसोटी मालिका आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याला भारत अ संघात स्थान मिळालेले नाही.

दुर्लक्षित झाल्यानंतर, उनाडकटने शुक्रवारी (१२ नोव्हेंबर) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये झंझावाती कामगिरी करत निवडकर्त्यांना फटकारले आहे. त्याने त्याच्या फलंदाजीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, जे पाहून चाहते आता त्याची तुलना अष्टपैलू हार्दिक पांड्याशी करत आहेत आणि त्याला पांड्यापेक्षा चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणत आहेत.

Just another pace bowler who can bat.. 😉 pic.twitter.com/FlIEns2JB6

— Jaydev Unadkat (@JUnadkat) November 12, 2021

उनाडकटच्या या फलंदाजीवरुन आता चाहते त्याची तुलना पांड्याशी करू लागले आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘हार्दिक पांड्याकडूपेक्षा चांगला शॉट खेळला आहे,.’ त्याचवेळी दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, ‘तू हार्दिक पांड्यापेक्षा चांगला अष्टपैलू आहेस.’

You are better all-rounder than hardik pandya

— Mohit (@Mohit67231116) November 12, 2021

Better shots than hardik pandya 😭😭

— Yash Jain 🇳🇿 (@kiwiyash____) November 12, 2021

उनाडकटने हैदराबादविरुद्ध ३२ चेंडूत ५८ धावांची स्फोटक खेळी खेळली. या वेगवान खेळीत त्याने मोहम्मद सिराजसारख्या सर्वोत्तम गोलंदाजाविरुद्ध ३ षटकार आणि ४ चौकार लगावले. आपल्या फलंदाजीचा व्हिडिओ शेअर करत उनाडकटने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आणखी एक वेगवान गोलंदाज, जो फलंदाजीही करू शकतो.’ या खेळीसह उनाडकटने निवड समितीवर निशाणा साधला आहे.

भारतीय संघ सध्या पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील वेगवान गोलंदाजी अष्टपैलूचा शोध घेत आहे. कारण पांड्या अलीकडच्या काळात फार कमी गोलंदाजी करत आहे. याशिवाय त्याचा खराब फलंदाजी फॉर्मही चिंतेचा विषय ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्रिकटेचा समावेश, भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने सामने; पाहा वेळापत्रक

टी२० विश्वचषकानंतर पुन्हा भिडणार न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघ, ‘या’ दिग्गजांना मिळू शकते विश्रांती

‘टी२० विश्वचषकाच्या संघ निवडीत माझा आणि विराटचा सहभाग नव्हताच’, शास्त्रींचा धक्कादायक खुलासा


Next Post
Shahid Afridi And Shaheen Afridi

सासरा आफ्रिदीने जावई शाहिन आफ्रिदीची काढली अक्कल; म्हणाला, 'मी अजिबात खुश नाही...'

Photo Courtesy: Twitter/T20WorldCup

पाकिस्तानचा घाम काढणाऱ्या मॅथ्यू वेडच्या कारकिर्दीवर लागला पूर्णविराम? न्यूझीलंडविरुद्ध खेळणार शेवटची मॅच

Photo Courtesy: Twitter/@ICC

पाकिस्तानला पाणी पाजत ऑस्ट्रेलियाला एकहाती सामना जिंकून देणाऱ्या मॅथ्यू वेडच्या हातावर कुणाचा टॅट्यू आहे?

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143