fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

लॉकडाऊनमध्ये ड्यूटीवरच झाला १८ वर्षीय अनोळखीचा मृत्यू, ऑनलाईन गेम खेळून भारतीय खेळाडूने केली कुंटुबाची मदत

Jeje Lalpekhlua Takes Part In Online Gaming To Aid Volunteer Family

कोरोना व्हायरस या जागतिक महामारीने जगभर कहर माजवला आहे. लोकांच्या आरोग्याबरोबर आर्थिक परिस्थितीवरही या महामारीचा मोठा परिणाम झालेला आहे. अनेक लोकांचे काम ठप्प पडले आहे, तर अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. अशात, लोकांना एक वेळचे अन्नही मिळणे कठीण जात आहे. परंतु, या हलाखीच्या परिस्थितीत अनेक लोक मदतीसाठी पुढे येत आहेत.

भारतीय फुटबॉल संघाचा स्ट्रायकर जेजे लालपेखलुआ (Jeje Lalpekhlua) यानेही अशाच एका पिडीत कुटुंबाची मदत केली आहे. परंतु, यासाठी त्याने खूप वेगळा मार्ग अवलंबला आहे. जेजेने यासाठी मिझोरमच्या एका मोबाईल गेमर्स सोबत मिळून ऑनलाईन गेमच्या साहाय्याने पिडीताच्या कुटुंबाची मदत केली आहे. यामध्ये तब्बल ३१ व्यावसायिक खेळाडूंचा समावेश होता.

झाले असे की, १८ वर्षीय के एच लालवेनमावीचा मागच्या आठवड्यात सूदूर क्षेत्रात लॉकडाऊनदरम्यान ड्यूटीवर असताना मृत्यू झाला. त्यामुळे फुटबॉलपटू जेजेने हे पाऊल उचलले.

जेजे म्हणाला की, “हे खूप सोपे आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. प्रत्येकाने दुसऱ्यांची मदत करण्यासाठी समोर यायला पाहिजे. आपल्याला काही फरक पडत नाही की, आपण कुठुन आलो आहोत? आपल्याजवळ काय आहे? सर्वांनी मदत करायला पाहिजे आणि त्यामुळेच मी इथे आहे.”

विशेष म्हणजे, जेजेने यापुर्वीही लॉकडाऊनमध्ये लोकांची मदत करण्यासाठी रक्तदान केले होते. तो म्हणाला की, “मला विश्वास आहे, आपण सगळे मिळून या उद्देश्याला पूर्ण करु आणि मिझोरममध्ये लवकरच सगळं काही ठीक होईल.”

ट्रेंडिंग घडामोडी-

‘बीसीसीआयने आयपीएल २०२० च्या तारखा लवकर जाहीर कराव्यात’

‘ते’ असे एक कारण, ज्यामुळे विराट आहे रोहितपेक्षा भारी

पहा व्हिडिओ- २१ वर्षांपूर्वी झाला होता क्रिकेट विश्वचषकातील सर्वात…

You might also like