इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला धूळ चारत १५१ धावांनी विजय मिळवला. यासह कसोटी मालिकेत १-० ची आघाडी देखील घेतली आहे. या सामन्यात इंग्लंड संघाकडून कर्णधार जो रूटने एकहाती झुंज दिली. यासह त्याने मोठा पराक्रम करत दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी (१६ ऑगस्ट) भारतीय संघ पराभवाच्या वाटेवर होता. परंतु, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी मिळून भारतीय संघाला २९८ धावांपर्यंत पोहचवले होते. भारतीय संघाने इंग्लंड संघाला विजयासाठी २७२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाकडून कर्णधार जो रूटने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. हा सामना इंग्लंड संघाने १५१ धावांनी गमावला.
परंतु, रूटने आपल्या अप्रतिम फलंदाजीने सर्वांचेच मन जिंकले. त्याने याच सामन्यातील पहिल्या डावात नाबाद १८० धावांची खेळी केली होती. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा ७ वा फलंदाज ठरला आहे.(Joe root clinch 7th spot in most test runs against India)
दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान
इंग्लंडचा कर्णधार जो रूटने भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात सर्वाधिक ३८६ धावा केल्या आहेत. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा ७ वा फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत भारतीय संघाविरुद्ध एकूण २०१० धावा केल्या आहेत. या यादीत सर्वोच्च स्थानी ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे. त्याने भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक २५५५ धावा केल्या आहेत. तसेच ॲलिस्टर कूकने २४३१ धावा केल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१) रिकी पाँटिंग : २५५५ धावा
२) ॲलिस्टर कूक : २४३१ धावा
३) क्लाईव्ह लॉईड : २३४४ धावा
४) जावेद मियाँदाद : २२२८ धावा
५) एस. चंदरपॉल : २१७१ धावा
६) मायकल क्लार्क : २०४९
७) जो रूट : २०१०*
महत्त्वाच्या बातम्या –
भारताचं काय घेऊन बसलाय, इंग्लंडच्या वृत्तपत्रातही भारताच्या विजयाचा डंका; ‘फ्रंटपेज’वर झळकली बातमी
मोदींनी शब्द पाळला!! नीरज चोप्रासोबत चुरमाचा, तर पीव्ही सिंधूबरोबर घेतला आईस्क्रीमचा आस्वाद
लॉर्ड्स कसोटीचा पराभव इंग्लंडच्या जिव्हारी, तिसऱ्या सामन्यासाठी ‘या’ विस्फोटक फलंदाजांला बोलावणार!