आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दरवर्षी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयसीसीतर्फे पुरस्कार दिला जातो. यामध्ये क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश असतो. दरम्यान नुकताच आयसीसीने २०२१ वर्षासाठी पुरस्कारांची घोषणा केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसीने )(icc) २०२१ वर्षासाठी इंग्लंडचा कर्णधार जो रूट (joe root) याची ‘टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’ (test cricketer of the year award) म्हणून निवड केली आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याने भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनला पछाडत हा पुरस्कार पटकावला आहे.
यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये राहिला आहे जो रूटचा बोलबाला
जो रूटच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने २०२१ वर्षात १५ कसोटी सामने खेळले. या सामन्यात त्याने ६ शतके झळकावत १७०८ धावा केल्या. नुकत्याच संपन्न झालेल्या ऍशेस मालिकेत इंग्लंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरीदेखील इंग्लंड संघाकडून एकट्या जो रुटने फलंदाजीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हेच कारण आहे की, त्याची टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. आयसीसीने हा पुरस्कार जाहीर करताना म्हटले की, “सतत धावा करण्याची भूक,मोठी कामगिरी करत जो रूटने हे यश मिळवले आहे..”
आर अश्विनने देखील केली आहे अप्रतिम कामगिरी
आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी आर अश्विनला (R ashwin) देखील नामांकन मिळाले होते. आर अश्विनने अप्रतिम गोलंदाजी करत २०२१ मध्ये ५० पेक्षा अधिक गडी बाद केले होते. ही कामगिरी पाहता आर अश्विनला देखील या पुरस्कारासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते.
आयसीसी पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंची यादी
आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर – शाहिन शाह आफ्रिदी (पाकिस्तान)
टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर – जो रूट (इंग्लंड)
वनडे क्रिकेटर ऑफ द इयर – बाबर आझम (पाकिस्तान)
टी २० क्रिकेटर ऑफ द इयर – मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)
महत्वाच्या बातम्या :
ऋतुराजवर अन्याय झालाय?, जबर फॉर्ममध्ये असूनही खेळण्याची संधी न दिल्याने भडकले भारतीय चाहते
सेफ हँड्स! क्षेत्ररक्षणात विराटचे दमदार प्रदर्शन, २ अप्रतिम कॅच घेत ‘या’ मातब्बर फिल्डरला पछाडले
हे नक्की पाहा: