इंग्लंड क्रिकेट संघाने बेन स्टोक्स कर्णधार बनल्यापासून जबरदस्त प्रदर्शन केले आहे. जो रुट याच्या नेतृत्वात इंग्लंड संघाला एकप्रकारची मरगळ आल्याचे पाहायला मिळत होते. कर्णधार रुट जरी महत्वपूर्ण खेळी करत अशला, तरी संघाचे एकंदरीत प्रदर्शन खूपच सुमार झाले होते. स्टोक्स कर्णधार झाल्यापासून चित्र पूर्णपणे बदलले आहे. अशात रुटने आपल्या कर्णधारपदाविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
जो रुट (Joe Root) याच्या मते, त्याला आपल्या कर्णधारपदाच्या काळात पुन्हा जाता आले, तर तो नक्कीच आफल्या नेतृत्वात बदल करेल. त्या दिवसांमध्ये परत जाता आले, तर रुट अगदी बेन स्टोक्स (Ben Stokes) याच्याप्रमाणे संघाचे नेतृत्व करू इच्छित आहे. दरम्यान, मागच्या वर्षभरात इंग्लंडच्या प्रदर्शनातील सुधारणेमागचे महत्वाचे कारण ठरले आहे, त्यांच बॅझबॉल (BazzBall) रणनीती. मुख्य प्रशिक्षक ब्रँडम मॅक्युलम (Brandon McCool) याचे टोपणनाव बॅझ असून यातूनच पुढे बॅझबॉल रणनीती उदयास आली आहे. या रणनीती इंग्लंड संघ कसोटी सामन्यांमध्येही तोडफोट फलंदाजी करताना दिसला आहे. प्रशिक्षक मॅक्युलमची ही नीती संघाच्या चांगलीच कामी आल्याचे दिसत आहे.
जो रुटने इंग्लंडसाठी 64 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केले. त्यातील 27 सामने जिंकले, तर 26 सामन्यात त्याला पराभव स्वीकारावा लागला. त्याच्या तुलनेत बेन स्टोक्सचे कर्णधारपद संघाला अधिक फायद्याचे ठरले आहे. याच पार्श्वभूमीर रुटने भूतकाळात परत जाण्याची संधी मिळाली, तर स्टोक्ससारखे नेतृत्व करेल, अशी इच्छा व्यक्त केली आहे. माध्यमांसमोर रुट म्हणाला, “जर मी त्या काळात पुन्हा जाऊ शकलो, तर परत जाऊन बेन स्टोक्सप्रमाणे संघाचे नेतृत्व करायला सुरूवात करेल. अगदी याच पद्धतीने मी खेळण्याचा माझा प्रयत्न असता. हे खूपच जास्त रोमांचक आहे. मला वाटते आम्ही संघाकडून आणि संघातील सदस्यांकडून खूप जास्त परिणाम मिळवत आहोत.”
दरम्यान, ऍशेस 2023च्या पहिल्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडची बॅझबॉल रणनीती एजबस्टन कसोटीत अपयशी ठरली. पण संघ तरीही आपली रणनीती बदलणार नाही, असे थेट संकेतेच रुटकडून मिळाले. “आम्ही आता चांगलं क्रिकेट खेळतोय आणि परिणामही चांगले मिळत आहेत. संघाला पुढे घेऊन जायचे असेल, तर एसा एखादा सामना पाहून आम्ही रणनीती बदलू शकत नाही. आम्ही असं म्हणणार नाही की, आपण गोष्टी वेगळ्या पद्धतीने केल्या पाहिजेत,” असे रुट पुढे म्हणाला. (Joe Root influenced by Ben Stokes’ leadership, says ‘If we go back in time…’)
महत्वाच्या बातम्या –
MPL 2023 । महिलांचा पहिला प्रदर्शनीय सामना 25 जून रोजी, पाहा वेळापत्रक
World Cup 2023 । शेड्यूलविषयी ‘असा’ आहे बीसीसीआयचा प्लॅन! तारीखही आली समोर