इंग्लंड संघाचा दिग्गज क्रिकेटपटू नासिर हुसेन यांनी जो रूट याच्या फलंदाजीवर प्रभावित होऊन जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जो रूट याचे भरपूर कौतुक केले आहे. जो रूट याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ९८, ९९ आणि १०० व्या कसोटी सामन्यामध्ये शतक झळकवले आहे.
गेल्या काही महिन्यात त्याचे प्रदर्शन इतके काही खास नव्हते. याच कारणास्तव सर्वत्र चर्चेला उधाण आले होते की, जो रूट याचा विराट कोहली, स्टीव स्मिथ आणि केन विलियमसन यांसारख्या सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीमध्ये समावेश आहे की नाही?? परंतु रूटने आपल्या जबरदस्त फलंदाजीने सर्वांना चांगलेच प्रत्त्युत्तर दिले आहे.
नासिर हुसेन यांनी केले रूटचे कौतुक
नासिर हुसेन यांनी कर्णधार जो रूट याचे भरपूर कौतुक केले आहे. ते म्हणाले, “जो रूट हा जेव्हा खराब फॉर्म मध्ये होता तेव्हाही त्याने ४० पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या होत्या. तसेच कसोटी कारकिर्दीतील १०० व्या सामन्यात शतक झळकावत त्याने दाखवून दिले की, तो एक महान फलंदाज आहे.” जो रूट याने श्रीलंका दौऱ्यावर जबरदस्त प्रदर्शन केले होते. त्याने एका सामन्यात २०० धावा सुद्धा केल्या होत्या. भारतीय संघाविरुद्धही त्याने हाच फॉर्म कायम राखला आहे.
जो रूट याची कामगिरी
इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट आपल्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना खेळत आहे. यात त्याने ४९.४ च्या सरासरीने ८२४९ धावा केल्या आहेत. यात ३१ विकेट्स चा ही समावेश आहे. तसेच त्याने खेळलेल्या १४९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९.४ च्या सरासरीने ४९६२ धावा केल्या आहेत. यात २६ विकेट्सचा समावेश आहे. त्याने इंग्लंड संघाकडून ३२ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत यात ८९३ धावा केल्या आहेत. यासोबतच ६ विकेट्स ही आपल्या नावे केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
जो रूटला शंभराव्या सामन्यात विजयाची भेट देण्याची आमची इच्छा आहे, बेन स्टोक्सचे प्रतिपादन
आयपीएल गाजवणाऱ्या एनरिच नॉर्टजेची पाकिस्तानविरुद्ध भेदक गोलंदाजी, पाहा व्हिडिओ
सामन्यासाठी समालोचकांची गरज नाही, एकटा रिषभ पंत पुरेसा, या माजी खेळाडूचे मजेशीर ट्विट