---Advertisement---

लॉर्ड्सचं मैदान अन् प्रथम फलंदाजीचा निर्णय जणू ठरलेलं समीकरण, तरीही रूटने का निवडली गोलंदाजी?

On: गुरूवार, ऑगस्ट 12, 2021 8:04 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला. दरम्यान इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून (12 ऑगस्ट) चालू झाला आहे. यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या या निर्णयावर क्रिकेटरसिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहेत. कारण लॉर्ड्सच्या मैदानावर नाणेफेक जिंकणारा कर्णधार सहसा प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतो. मात्र याच मैदानावर रूटने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला? यामागचे कारण त्याने सांगितले आहे. सध्या लॉर्ड्समधील वातावरण पाहता पावसाच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण सामना सुरू होण्यापूर्वी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे २० मिनिटे उशिरा नाणेफेक करण्यात आली होती. त्यानंतर सामना सुरू झाल्यावरही पुन्हा एकदा काहीवेळ पावसाच्या सरी आल्या होत्या.

नाणेफेक जिंकून याबाबत बोलताना जो रूट म्हणाला, “आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचे ठरवले आहे. मैदानात थोड्याफार प्रमाणात गवत आहे. परंतु इथले वातावरण पाहता व परिस्थितीचा आढावा घेता, सध्याचे वातावरण गोलंदाजीसाठी पूरक असे आहे. त्यामुळे प्रथम गोलंदाजी करनेच योग्य ठरेल.”

दरम्यान, इंग्लंड संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात संघात ३ बदल केले आहेत. जॅक क्रॉली ऐवजी हसिब हमीदला संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर स्टुअर्ट ब्रॉडच्या जागी मार्क वूड आणि मोईन अलीला डॅनियल लॉरेन्स ऐवजी संघात स्थान दिले आहे. त्याचबरोबर स्टुअर्ट ब्रॉडने दुखापतीमुळे मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे. तर भारतीय संघात शार्दुल ठाकूरच्या ऐवजी ईशांत शर्माला संघात स्थान देण्यात आले.

पुढे बोलताना रूट म्हणाला, “लॉर्ड्सच्या मैदानावर चेंडू स्पिन होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा असे झाले देखील आहे. त्यामुळेच मोईन अलीला स्पिन गोलंदाज म्हणून संघात स्थान दिले. तो एक अनुभवी खेळाडू आहे जो चांगल्या धावाही करू शकतो. तसेच संघासाठी विकेट्सही मिळवून देऊ शकतो. त्याचबरोबर जेम्स अँडरसन देखील दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार आहे. या सामन्यापूर्वी दुखापतीमुळे अँडरसनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून त्यानेच पहिले षटक टाकले आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघातील अंतिम ११ खेळाडू पुढील प्रमाणे –

भारत –
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड –
रोरी बर्न्स, डॉमिनिक सिब्ली, हसिब हमीद, जो रूट (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, मोईन अली, सॅम करन, ऑली रोबिन्सन, मार्क वूड आणि जेम्स अँडरसन.

महत्त्वाच्या बातम्या –
टॉस अन् विराटचं जरा वाकडंच! इंग्लंडमध्ये आठव्यांदा कोहलीने गमावली नाणेफेक, केला नकोसा विक्रम
शार्दुल संघाबाहेर झाल्यानंतरही अश्विनला बसवलं बाकावर, कर्णधार कोहलीने सांगितल यामागचं कारण
दशकभरात जे जमले नाही ते ‘रोहित’ आल्यापासून साध्य होतय! पाहा ही आकडेवारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---