सध्या श्रीलंकेचा इंग्लंड दौरा सुरु आहे. दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडनं 7 विकेट्सनं विजय मिळवला. दरम्यान स्टार फलंदाज जो रूट (Joe Root) पहिल्या सामन्यात जोरदार फाॅर्ममध्ये दिसला होता. त्यानं 1 अर्धशतक देखील झळकावलं होतं. दुसऱ्या सामन्यातही रुटचा फाॅर्म कायम राहिला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात रूटनं शानदार फलंदाजी करत शतक ठोकले आणि इतिहास रचला.
लॉर्ड्स कसोटीत रूटने दमदार कामगिरी केली आहे. त्यानं पहिल्या डावातही शतक झळकावले. यावेळी रूटने 143 धावांची खेळी खेळली होती. त्याने 206 चेंडूंचा सामना करत 18 चौकार लगावले होते. आता दुसऱ्या डावातही रूटने शतक झळकावले आहे. रुटने 121 चेंडूंचा सामना करत 103 धावा केल्या. या खेळीत रूटने 10 चौकार लगावले. या खेळीमुळे इंग्लंडने दुसऱ्या डावात सर्वबाद होईपर्यंत 251 धावा केल्या.
जो रूट इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 145 कसोटी सामन्यांमध्ये 34 शतके झळकावली आहेत, तर 65 अर्धशतकंही केली आहेत. रूटच्या आधी हा रेकाॅर्ड ॲलिस्टर कुकच्या नावावर होता. कुकने 161 कसोटी सामन्यांमध्ये 33 शतके झळकावली आहेत. त्याने 57 अर्धशतकेही केली आहेत.
रूटच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं इंग्लंडसाठी कसोटीत 2012 मध्ये भारताविरुद्ध पदार्पण केलं होतं. तेव्हापासून त्यानं 144 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये 50.33च्या सरासरीनं 12,131 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्यानं 34 शतकं झळकावली आहेत. कसोटीमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 254 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऐतिहासिक…! टी20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार ठोकणारा ‘हा’ एकमेव भारतीय
BAN vs PAK: बाबर आझम पुन्हा ढेपाळला, चाहत्यांनी दिला निवृत्तीचा सल्ला
Champion’s Trophy: हरभजन सिंगचे बदलले मत, आता म्हणाला, “भारताने पाकिस्तानमध्ये…”