इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषक 2023चा पहिला सामना रंगला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना आयोजित केला गेला असून इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. जो रुट याने यावर्षीच्या विश्वचषकातील पहिले अर्धशतक ठोकले.
वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) भारताताली 10 वेगवेगळ्या स्टेडियमवर खेळला जाणार आहे. गतविजेता संघ इंग्लंड आणि न्यूझीलंड गुरुवारी (5 ऑक्टोबर) विश्वचषकातील पहिला सामना खेळला गेला. इंग्लंडने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. संघासाठी वरच्या फळीत एकटा जो रुट (Joe Root) अर्धशतक करू शकला. विश्वचषक 2023 मधील पहिले अर्धशतक रुटच्या नावावर झाले. 57 चेंडूत त्याने ही कामगिरी केली. रुटने या सामन्यात एकूण 86 चेंडू खेळले आणि 77 धावा करून विकेट गमावली. ग्लेन फिलिक्स याने रुटचा त्रिफळा उडवला.
https://www.instagram.com/reel/CyA6fgDvYUI/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
(Joe Root scored the first half-century of ICC 2023)
इंग्लंड प्लेईंग इलेव्हन- जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, जो रूट, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वूड, हॅरी ब्रूक.
न्यूझीलंड प्लेईंग इलेव्हन- डेवॉन कॉनवे, विल यंग, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, टॉम लॅथम( कर्णधार), ग्लेन फिलिप्स, ट्रेंट बोल्ट, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, रचिन रवींद्र, मॅट हेन्री
महत्वाच्या बातम्या –
ऋतुराजच्या ‘यंग इंडिया’ने चीनमधील मुलांना दिले क्रिकेटचे धडे, व्हिडिओ पाहाच
‘काय राव हे…?’, पत्रकाराच्या प्रश्नावर रोहितने दिली ‘अशी’ रिऍक्शन, पाकिस्तानी कर्णधार बाबरही झाला लोटपोट