fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

तेव्हा धोनी आता पृथ्वी शॉ, जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर मिळाले जीवदान, पहा व्हिडिओ

आयपीएल 2019 च्या मोसमात आत्तापर्यंत अनेकदा स्टंम्पवपरील बेल्स न पडल्याने फलंदाजांना जीवदान मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. सोमवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडलेल्या सामन्यातही अशीच घटना घडली.

राजस्थानने दिल्लीला 192 धावांचे आव्हान दिले होते. दिल्ली या आव्हानाचा पाठलाग करत असताना 16 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर ही घटना घडली. त्यावेळी दिल्लीचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ फलंदाजी करत होता. तर जोफ्रा आर्चर गोलंदाजी करत होता.

आर्चरने हा चेंडू वेगाने फुलटॉस टाकला होता. त्या चेंडूवर शॉ फटका मारायला चुकला. त्यामुळे चेंडू स्टंम्पवरील बेल्सला धक्का देत सरळ यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या हातात गेला. ज्यावेळी चेंडू बेल्सला लागला त्यावेळी बेल्स आणि स्टंम्पवरील लाईटही लागले होते. परंतू बेल्स खाली पडल्या नाही. त्यामुळे शॉला जीवदान मिळाले.

यापूर्वीही आयपीएलच्या या 12 व्या मोसमात अनेकदा अशा गोष्टी घडल्या आहेत. विशेष म्हणजे आर्चर गोलंदाजी करत असताना दुसऱ्यांदा ही गोष्ट घडली आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना आर्चरने धोनीला टाकलेला एक चेंडू स्टंम्पला लागला होता. परंतू बेल्स पडल्या नव्हत्या.

तसेच त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघातील सामन्यात धोनीने फेकलेला चेंडू स्टंम्पला लागूनही बेल्स पडल्या नव्हत्या. त्यामुळे केएल राहुलला जीवदान मिळाले होते. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स संघातील सामन्यातही धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर ख्रिस लीनला बेल्स न पडल्याने जीवदान मिळाले होते.

इलेक्ट्रिक वायरिंग असल्याने बेल्सचे वजन वाढले आहे. त्यामुळे साधारण बेल्सपेक्षा हे बेल्स वजनदार आहेत. कदाचीत याच कारणामुळे स्टंम्पला चेंडू लागूनही बेल्स न पडल्याच्या घटना घडल्या असू शकतात.

सोमवारी झालेल्या या सामन्यात दिल्लीने 6 विकेट्सने विजय मिळवला. हा त्यांचा या मोसमातील सातवा विजय आहे. तसेच त्यांनी गुणतालिकेत अव्वल क्रमांकही मिळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल २०१९चा अंतिम सामना चेन्नईला नाही तर होणार या ठिकाणी

१० वर्षांपूर्वीचा तो फोटो पाहुन कोहली, स्टेनने दिली अशी प्रतिक्रिया, पहा व्हिडिओ

धोनीला असे करताना पाहुन पार्थिव पटेलही झाला आश्चर्यचकित…

You might also like