क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात चढाओढ पाहायला मिळणे साधारण आहे. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) अबु धाबीच्या मैदानावर किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झालेल्या आयपीएल सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. या सामन्यात राजस्थानचा गोलंदाज जोफ्रा आर्चरने पंजाबच्या ख्रिस गेलचा ९९ धावांवर त्रिफळा उडवला. पण त्यानंतर आर्चरने सर्वांचे मन जिंकणारे एक कृत्य केले.
ख्रिस गेलला केले ९९ धावांवर बाद
झाले असे की, प्रथम फलंदाजी करताना पंजाबने पहिल्याच षटकात मनदीप सिंगची विकेट गमावली. त्यानंतर कर्णधार केएल राहुल आणि विस्फोटक फलंदाज गेल एका बाजूने संघाचा डाव पुढे नेत होते. गेलने १५७.१४ च्या स्ट्राईक रेटने आक्रमक फलंदाजी करत डावातील १९.३ षटकापर्यंत ९९ धावा केल्या होत्या. आता त्याला आयपीएल कारकिर्दीतील ७ वे शतक नोंदवण्यासाठी फक्त एका धावेची गरज होती.
मात्र डावातील २०वे षटक टाकत असलेल्या आर्चरने पुढील यॉर्कर चेंडूवर गेलची दांडी उडवली. त्यामुळे गेल ९९ धावावंर बाद (नर्वस नाईंटीज) झाला. त्यानंतर जरी आर्चरने त्याची विकेट घेतली असली, तरी त्याच्या अफलातून फलंदाजीची प्रशंसा करायला तो चुकला नाही. त्याने गेल मैदानाबाहेर पडण्यापूर्वी त्याच्याशी हस्तांदोलन केले.
जोफ्रा आर्चरने केले कौतुक
एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने सामन्यानंतर ट्विटरवर गेलची प्रशंसा करणारे ट्विटही केले. त्याने दोघांचा हात मिळवतानाचा फोटो शेअर केला आणि ‘आताही तो बॉसच आहे,’ असे कॅप्शन दिले.
Still the boss @henrygayle pic.twitter.com/bV1y3Azijp
— Jofra Archer (@JofraArcher) October 30, 2020
राजस्थानची गुणतालिकेत भरारी
राजस्थानने दमदार फलंदाजी करत केवळ १७.३ षटकात ३ विकेट्स गमावत पंजाबचे १८६ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. हा त्यांचा हंगामातील ६वा विजय होता. यासह राजस्थानने १२ गुणांची कमाई करत गुणतालिकेत ५वे स्थान पटकावले आहे, तर पंजाब संघ राजस्थानविरुद्धचा सामना गमावल्यानंतरही गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यांच्या खात्यातही १२ गुणांची नोंद आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने धोनीला दिला ट्रिब्यूट? सत्य घ्या जाणून
‘हा’ खेळाडू बनू शकतो तिन्ही क्रिकेट प्रकारातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू, गंभीरची भविष्यवाणी
दुष्काळात तेरावा महिना ! हैदराबादचा ‘हा’ स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर
ट्रेंडिंग लेख-
सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार
…आणि १५ वर्षांपूर्वी ‘त्या’ खेळीने धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला
IPL 2020 – धोनीच्या ‘या’ पाच पठ्ठ्यांनी कोलकाताच्या सेनेला दाखवले आस्मान