इंग्लंड संगाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला २०२२च्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्स संघाने खरेदी केले होते. मुंबई संघाने त्याला या गोष्टीचा विचार करून संघात घेतले होते की, हा २६ वर्षीय गोलंदाज जोफ्रा आर्चर २०२३ पर्यंत आयपीएलमध्ये सहभागी होण्यास तयार नव्हता. मुंबई संघाच्या या निर्णयावरून असे दिसत आहे की, फ्रॅंचायझीने त्याला भविष्याचा विचार करुन मोठ्या रकमेत खरेदी केले आहे. मुंबई इंडियन्स संघाने त्याला ८ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. आयपीएल २०२२चा पहिला सामना शनिवारी (२६ मार्च) खेळला जाणार आहे.
जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे. तो आतापर्यंत राजस्थान राॅयल्स संघाकडून खेळला आहे. त्याने ३५ सामन्यांत ४६ विकेट्स घेतल्या आहेत. दुखापतीमुळे आणि आयपीएल २०२२ मध्ये उपलब्ध नसल्यामुळे जोफ्रा आर्चरसाठी राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांनी एकमेव बोली लावणारे संघ ठरले होते. मुंबईने याआधीच बोलीमध्ये राजस्थान रॉयल्सला पराभूत केले होते आणि नंतर हैद्राबादला सुद्धा मागे टाकले होते.
जेव्हा मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्याला विकत घेतले, त्याबद्दल त्याने आता मुंबईने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये याबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला, “माझा फोन बंद होऊ लागला. एकापाठोपाठ मेसेज येत होते. मला वाटले की, मुंबई संघातील काही लोकांनी ते केले. तेव्हा मी +९१ वरून कॉल पाहिला, मला नेमके काय झाले ते कळले. मी खरोखरच उत्साहित होतो, कारण मुंबई एक उत्तम फ्रँचायझी आहे. काही गेम आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी मी उत्सुक आहे.”
खरं तर ‘+९१’ हा भारताचा मोबाईल नंबर कोड आहे. केवळ भारतातच नाही, तर परदेशातही आपण इतर कोणत्याही व्यक्तीला कॉल करतो, तेव्हा आपल्या नंबरसमोर ‘+९१’ दिसतो, जेणेकरून हा नंबर कोणत्या देशाचा आहे, हे समजू शकेल. प्रत्येक देशाचा फोन नंबर कोड वेगळा असतो. मुंबई इंडियन्स संघ पहिला सामना २७ मार्चला दिल्ली कॅपिटल्स संघासोबत खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘जड्डू’च का? चेन्नईने धोनीचा उत्तराधिकारी म्हणून जडेजाला निवडण्याचे ‘हे’ आहे खास कारण
ख्वाजाची पाकला सजा, धावांचा पाऊस पाडत घेतली यजमानांची मजा; नोंदवला मोठ्ठा रेकाॅर्ड
म्हणून आयपीएल भारीये.! रविंद्र जडेजाचा संघर्ष पाहून तु्म्हीही म्हणाल, ‘इथे कष्टाचं फळ मिळतंच’