आजपासून(22 ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. पण या सामन्याआधी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत असताना ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथच्या फलंदाजी शैलीची कॉपी करताना दिसून आला आहे.
हा व्हिडिओ Cricket.com.au ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये आर्चर स्मिथप्रमाणे फलंदाजी करताना दिसत आहे. याबरोबरच आर्चर स्मिथच्या या चेंडू सोडण्याच्या अनोख्या पद्धतीचेही अनुकरण करताना व्हिडिओमध्ये दिसून आला आहे.
लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या ऍशेस सामन्यात स्मिथ फलंदाजी करत असताना त्याने अनेक चेंडू अनोख्या प्रकारे सोडले होते. त्याच्या या चेंडू सोडण्याच्या अनोख्या पद्धतीचा गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावरगी जोरदार व्हायरल झाला होता.
Is that Jofra Archer or Steve Smith in the nets at Headingley? #Ashes @alintaenergy pic.twitter.com/RT5ADoSUjr
— cricket.com.au (@cricketcomau) August 22, 2019
"I've sort of fused Flashdance with MC Hammer ****"#EngvAus pic.twitter.com/CNWrZruCgE
— Vitality County Championship (@CountyChamp) August 16, 2019
आर्चरने लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीतून कसोटी पदार्पण केले आहे. या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने 5 विकेट्स घेतल्या.
तसेच लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आर्चरचा चेंडू मानेच्या जवळ लागून स्मिथ दुखापतग्रस्त झाला होता. स्मिथला या दुखापतीमुळे 80 धावांवर असताना रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावे लागले. पण नंतर तो एक विकेट गेल्यानंतर पुन्हा फलंदाजीला आला. मात्र तो 92 धावांवर बाद झाला.
पण यानंतर तो दुसऱ्या डावात फलंदाजीला आला नाही. त्याच्याऐवजी आयसीसीच्या नवीन नियमाप्रमाणे फलंदाज मार्नस लाब्यूशानेची ऑस्ट्रेलियाने चालू सामन्यात बदली खेळाडू म्हणून निवड केली.
तसेच या दुखापतीमुळे स्मिथला तिसऱ्या कसोटी सामन्यालाही मुकावे लागले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया; रोहितला संधी नाही
–विकेट्सचे ‘द्विशतक’ पूर्ण करताच जडेजाचा होणार या खास यादीत समावेश
–कर्णधार कोहलीकडून रिकी पॉटिंगच्या या खास विक्रमाला धोका…