आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने विजयी लय पकडली आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभूत व्हावे लागल्यानंतर मुंबईने सलग तीन विजय मिळवत विजयाची हॅट्रिक साधली. मुंबईने हे विजय आपल्या अनुनभवी गोलंदाजांच्या जोरावर मिळवले. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा हंगाम सुरू होण्याआधीच बाहेर पडला आहे. तर संघाचा दुसरा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर पहिल्या सामन्यानंतर मैदानात उतरू शकला नाही. मात्र आता त्याने स्वतः आपण पुन्हा कधी मैदानात येणार याबाबत वक्तव्य केले.
आर्चर याला मुंबई इंडियन्सने मागील हंगामात आठ कोटींची मोठी रक्कम देत आपल्या ताब्यात सामील करून घेतले होते. मात्र, दुखापतीमुळे तो हंगामात एकही सामना खेळू शकला नव्हता. मुंबईने त्याच्यावरील विश्वास कायम ठेवत त्याला या हंगामात रिटेन केले. आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर झालेल्या चारही सामन्यात तो बाकावरच बसून राहिला. दुखापतीमुळे आर्चर खेळत नसल्याचे सांगण्यात आले.
मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापनाला सातत्याने आर्चर याच्या दुखापतीविषयी विचारण्यात येत आहे. मात्र, आता स्वतः आर्चरने पुढे येत यावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,
“मला जी दुखापत आत्ता असल्याचे सांगितले जाते ती अगदी छोटी आहे. मी जवळपास दीड वर्ष या दुखापतीशी झुंज देत होतो. मनात आणले तर मी उद्या खेळेल. मात्र, मला तसे करायचे नाही. मला वेगवान गोलंदाजी करायला आवडते. त्यासाठी तुम्हाला चांगले वाटायला हवे. आणि मी सध्या चांगले वाटण्यावरच भर देतोय. ज्या क्षणी मला वाटेल आता खेळावे मी संघात असेल.”
आर्चर त्याच्या हाताच्या दुखापतीमुळे दोन वर्ष सर्व प्रकारच्या क्रिकेटपासून दूर होता. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्याने चालू वर्षी जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुनरागमन केलेले.
(Jofra Archer Talk On His Injury And Comeback In IPL 2023 For Mumbai Indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयचा मोठा निर्णय! Asian Gamesमध्ये भारतीय संघ पाठवण्यास दिला थेट नकार, कारण घ्या जाणून
पाच पराभवांनी गांगुलीची हवा झालेली टाईट, दिल्लीने विजय मिळवताच म्हणाला, ‘माझी पहिल्या कसोटीतील धाव…’