इंग्लंडचा घातक वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर गेले काही महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर होता. भारताविरुद्धच्या मालिकेत दुखापत झाल्याने तो मर्यादित षटकांच्या मालिकेला तसेच त्यानंतर झालेल्या आयपीएलला देखील मुकला होता. मात्र आता दुखापतीतून सावरल्याने त्याचे पुनरागमन झाले आहे.
सध्या तो कौंटी क्रिकेटमध्ये ससेक्स संघाकडून खेळतो आहे. या संघाकडून खेळतांना पुन्हा एकदा तो तेजतर्रार गोलंदाजीने फलंदाजांना जेरीस आणतो आहे. त्याचा असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे ज्यात आर्चरच्या बाऊन्सरने फलंदाज चक्क जमिनीवर पडलेला दिसतो आहे.
आर्चरचा घातक बाऊन्सर
जोफ्रा आर्चर आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याचा रन-अप फार वेगवान नसला तरी देखील त्याच्या अॅक्शनने तो उत्तम वेग आणू शकतो. त्यामुळे भलेभले आंतरराष्ट्रीय फलंदाज त्याची गोलंदाजी खेळतांना अडचणीत येतात. असाच प्रकार काहीसा कौंटी क्रिकेटमध्ये घडला.
जॅक लिनींग या फलंदाजाला आर्चरने एक बाऊन्सर टाकला. हा बाऊन्सर फलंदाजाने खाली वाकून सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू इतका वेगवान होता की त्यामुळे फलंदाजाला आपला बॅलन्स सांभाळता आला नाही. आणि तो खाली पडला. हा व्हिडिओ १३ मे रोजी शेअर केला गेला होता. आत्तापर्यंत तब्बल १२ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
पाहा व्हिडिओ –
Well, @JofraArcher certainly kept Jack Leaning on his toes ????#LVCountyChamp pic.twitter.com/9pEBWnLebH
— Rothesay County Championship (@CountyChamp) May 13, 2021
दरम्यान, या सामन्यात जोफ्रा आर्चरने पहिल्या डावात २९ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. तर दुसर्या डावात त्याला एकच विकेट घेता आली. याआधी पण ससेक्स संघाने आर्चरचा एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यात नेटमध्ये प्रॅक्टिस करतांना त्याने एका फलंदाजाला बाऊन्सरने असेच पाडले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोना विरोधी लढ्यासाठी इरफान पठाणचा पुन्हा पुढाकार! ही संपूर्ण कमाई करणार दान
तुम्हीच पैसे का देत नाही?, असा प्रश्न विचारत ट्रोल करण्याऱ्याला हनुमा विहारीने चांगलेच खडसावले
कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक नसल्याच्या अफवेवर भुवनेश्वर संतापला, ट्विट करत सुनावले खडे बोल




