भारतीय संघ जून महिन्यात न्यूझीलंड विरूद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. तसेच त्यानंतर इंग्लंडशी पाच कसोटी सामन्यांची मालिका देखील खेळणार आहे. यासाठीचा भारतीय संघ काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. मात्र या संघात अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारला स्थान मिळाले नाही.
यानंतर या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले. इतकेच नाही तर एका वृत्तपत्राने भुवनेश्वर कुमार स्वतःच कसोटी क्रिकेट खेळायला उत्सुक नसल्याचे कारण देखील समोर आणले होते. मात्र आता या प्रकारावर भुवनेश्वर कुमारने समोर येत स्पष्टीकरण दिले आहे.
अफवांवर संतापला भुवनेश्वर
एका प्रसिद्ध वृत्तपत्राने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात भुवनेश्वर कुमार स्वतःच कसोटी क्रिकेट खेळायला उत्सुक नसल्याची माहिती दिली होती. भुवनेश्वर केवळ कसोटीच नाही तर वनडे क्रिकेटसाठी देखील अनुत्सुक असल्याचे निवड समितीला वाटते आहे. याच कारणामुळे त्याला इंग्लंड दौऱ्यातून वगळण्यात आले, असे या वृत्तपत्राने छापले होते. मात्र ही माहिती केवळ अफवाच असल्याचे भुवनेश्वर कुमारने स्पष्ट केले. हे वृत्त छापणाऱ्या वृत्तपत्रावर तो चांगलाच संतापला होता. त्याने ट्विट करत या माहितीचे खंडन केले.
आपल्या ट्विट मध्ये भुवनेश्वर म्हणाला, “मी कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक नाही, अशी माहिती देणारे काही आर्टिकल्स छापून आल्याचे मी पाहिले. मात्र मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी कायमच स्वतःला तिन्ही प्रकाराच्या क्रिकेटसाठी तयार केले आहे. यात संघ निवडीचा काहीही संबंध नाही. आणि इथून पुढेही तेच करत राहील. एक सूचना आहे – कृपया ‘सूत्रांच्या’ हवाल्याने तुमचे स्वतःचे ठोकताळे मांडू नका.” अशा तिखट शब्दात भुवनेश्वरने या अफवांचा समाचार घेतला आहे.
There have been articles about me not wanting to play Test cricket. Just to clarify, I have always prepared myself for all three formats irrespective of the team selection and will continue to do the same.
Suggestion – please don’t write your assumptions based on “sources”!— Bhuvneshwar Kumar (@BhuviOfficial) May 15, 2021
भुवनेश्वरने आपला शेवटचा कसोटी सामना २०१८ साली दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो कसोटी संघातून बाहेर झाला. त्याच्याजागी इतर गोलंदाजांनी संघात स्थान पक्के केल्याने आता त्याला पुनरागमन करणे कठीण जाते आहे. इंग्लंड दौर्यावर देखील याच कारणाने त्याला स्थान मिळाले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल अडीच वर्षांनी बॉल टेम्परिंग प्रकरणाबाबत कॅमेरून बेनक्रॉफ्टने केला मोठा खुलासा, म्हणाला..
‘या उन्हाळी हंगामात केन विलियम्सन विराट कोहलीपेक्षा जास्त धावा करेल,’ पाहा कोणी केलंय हे विधान
“मी त्याला कधीच विसरू शकत नाही, कारण…”, टीम पेनचे कोहलीबाबत मोठे भाष्य