जानेवारी महिन्यात अफगाणिस्तान संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यासाठी अफगाणिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी पुन्हा एकदा इंग्लंडचा माजी दिग्गज जॉनाथन ट्रॉट याच्या खांद्यावर दिली गेली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाबाबत सोमवारी (1 जानेवारी) हा महत्वाचा निर्णय घेतला.
इंग्लंडचा माजी दिग्गज फलंदाज जॉनाथन ट्रॉट (Jonathan Trott) मागच्या मोठ्या काळापासून अफगाणिस्तानचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यभार पाहत आहे. त्याला 18 महिन्यांपूर्वी इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले गेले होते. या दीड वर्षांच्या काळात त्याच्या मार्गदर्शनाखाली अफगाणिस्तान संघाच्या प्रदर्शनात मोठी सुधारणा पाहायला मिळाली. मागच्या वर्षी पार पडलेल्या वनडे विश्वचषकात अफगाणिस्तानने आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधले होते. इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेदरलँड या संघांना ट्रॉटच्या मार्गदर्शनातील अफगाणिस्तान संघाने विश्वचषक स्पर्धेदरम्यान मात दिली. प्रशिक्षकाच्या भूमिकेत स्वतःला सिद्ध केल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला पुन्हा एकदा संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले आहे. पुढच्या एक वर्षासाठी त्याच्या कार्यकाळ वाढवला गेला आहे.
ट्रॉटच्या मार्गदर्शखाल अफगाणिस्तान संघाने आतापर्यंत 23 वनडे सामने खेळले आहेत, ज्यापैकी 8 सामन्यात संघाला विजय मिळला. वनडे विश्वचषकातील प्रदर्शनासह बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका ट्रॉट प्रशिक्षक असताना अफगाणिस्तानने जिंकली. टी-20 क्रिकेटमधील 26 सामन्यांमध्ये त्याने अफगाणिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली. यातील 11 सामन्यात संघाला यश मिळाले. यादरम्यान पाकिस्तानविरुद्ध एकमात्र टी-20 मालिका अफगाणिस्तानला जिंकता आली.
जॉनाथन ट्रॉट इंग्लंड क्रिकेट संघाचा एक माहन खेळाडू राहिला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 52 कसोटी सामन्यांमध्ये 3835 धावा केल्या. 2010-11 च्या ऍशेस मालिकेत ट्रॉटने इंग्लंड संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडली होती. वनडे क्रिकेटमध्ये 68 सामन्या 51 च्या सरासरीने त्याने 2819 धावा केल्या आहेत. 2015 साली या दिग्गज फलंदाजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. (Jonathan Trott’s tenure as Afghanistan head coach has been extended by a year)
महत्वाच्या बातम्या –
Rohit Sharma । भारताचा टी-20 कर्णधार रोहितच! आगामी मालिकेसह विश्वचषकात करणार संघाचे नेतृत्व
चेन्नई क्विक गन्सने उडवला गुजरात जायंट्सचा धुव्वा, तेलुगू योद्धाकडून राजस्थान वॉरियर्सचा मोठा पराभव