भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात आज जॉनी बेयरस्टोने कर्णधार विराट कोहलीचा खास विक्रम मोडला.
त्याने यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतली आहे. आज ३६ चेंडूत नाबाद २४ धावा करताना त्याने हा पराक्रम केला.
त्याने यावर्षी ३० सामन्यात ४२.७२च्या सरासरीने १४१० धावा केल्या आहेत. तर विराटने यावर्षी २१ सामन्यात ६६.८५च्या सरासरीने १४०४ धावा केल्या आहेत.
कालच हा विक्रम विराटच्या नावावर झाला होता.
यावर्षी केवळ ८ फलंदाजांनी यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्यात शिखर धवन हा एकमेव भारतीय आहे. त्याने यावर्षी २४ सामन्यात १०५५ धावा केल्या आहेत.
विराटने १४०४ पैकी ५०९ धावा कसोटीत, १४६ धावा टी२०मध्ये तर ७४९ धावा वनडेत केल्या आहेत. गेल्यावर्षी विराटने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८१८ धावा केल्या होत्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–अर्जून तेंडुलकर करतोय लॉर्ड्सच्या ग्राउंडस्टाफला मदत, चाहत्यांनी केले जोरदार कौतूक
–जेम्स अॅंडरसनकडून कुंबळेच्या जंबो विक्रमाची बरोबरी