राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर मागच्या काही सामन्यांपासून अपेक्षित प्रदर्शन करू शकला नव्हता. मंगळवारी (२४ मे) गुजरात टायटन्साविरुद्धच्या क्वालिफायर सामन्यात मात्र त्याला पुन्हा सूर गवसला. बटलरच्या प्रदर्शनाच्या जोरावर राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना १८८ धावा केल्या. यादरम्यान बटलरने आयपीएलच्या एका महत्वाच्या यादीत भारतीय दिग्गज विराट कोहलीला मागे टाकले.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या (GT vs RR) या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १८८ धावा केल्या. जोस बटलर (Jos Buttler) या सामन्यात चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरला. त्याने ५६ चेंडूत ८९ धावा केल्या. यामध्ये तब्बल १२ चौकार आणि २ षटकार मारले. सामन्यात बटलरच्या बॅटमधून निघालेल्या २ षटकारांमुळे विराट कोहलीला नुकसान झाले आहे. एका आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत बटलर आता पाचव्या क्रमांकावर आला आहे, तर विराट मात्र एका क्रमांकाने खाली घसरून सहाव्या क्रमांकावर आला आहे.
एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. गेलने आयपीएल २०१२ मध्ये ५९ षटकार मारले होते. दुसऱ्या क्रमांकावर आंद्रे रसेल आहे, ज्याने आयपीएल २०१९ मध्ये ५२ षटकार मारले होते. ५१ षटकारांच्या जोरावर गेल पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर आहे. यादीत चौथ्या क्रमांकावर देखील ख्रिस गेलचे नाव आहे, ज्याने २०११ साली एका हंगामात ४४ षटकार मारले होते. आता बटलर या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर अनुक्रमे गेल आणि विराटचे नाव आहे.
एका आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
५९ षटकार – ख्रिस गेल (आयपीएल २०१२)
५२ षटकार – आंद्रे रसेल (आयपीएल २०१९)
५१ षटकार – ख्रिस गेल (आयपीएल २०१३)
४४ षटकार – ख्रिस गेल (आयपीएल २०११)
३९ षटकार – जोस बटलर (आयपीएल २०२२)*
३८ षटकार – ख्रिस गेल (आयपीएल २०१५)
३८ षटकार – विराट कोहली (आयपीएल २०१६)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्धशतक न करताही सॅमसनच्या नावावर खास विक्रमाची नोंद, बनला फक्त दुसरा भारतीय पठ्ठ्या
सामना जिंकायचं जाऊद्या ‘या’ नकोशा विक्रमात धोनीला वरचढ ठरलाय सॅमसन, पाहा आकडेवारी
तुझसम तूच महान! धोनीवर कितीही टीका होऊदेत, पण प्रत्येक खेळाडूला त्याच्यासारखच बनायचंय