---Advertisement---

भारीच! १४४ वर्षाच्या क्रिकेट इतिहासात ‘असा’ कारनामा करणारा बटलर दुसराच यष्टिरक्षक

On: गुरूवार, ऑगस्ट 26, 2021 1:14 AM
Jos-Buttler
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर सुरू आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, हा निर्णय इंग्लिश गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आला. या डावात इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर याने एक अनोखी कामगिरी नोंदवली.

बटलरची यष्ट्यांमागे खास कामगिरी
या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज टिकाव धरू शकले नाही. एकापाठोपाठ एक भारतीय फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतत होते. या दरम्यान इंग्लंडसाठी बटलरने यष्टिरक्षण करताना सलग ५ झेल टिपले. गेल्या १४४ वर्षात असा कारनामा करणारा तो दुसराच यष्टिरक्षक ठरला आहे.

भारतीय संघ फलंदाजी करत असताना, जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर बटलरने प्रथम केएल राहुलचा झेल टिपला. राहुलने गेल्या सामन्यात शतक झळकावले होते. परंतु, या सामन्यात तो भोपळा ही न फोडता माघारी परतला. त्यानंतर पाचव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर चेतेश्वर पुजारा देखील बटलरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. कसोटी क्रिकेटमध्ये विराट आणि अँडरसन यांची लढत पाहण्यासारखी असते. या डावात देखील विराटला जेम्स अँडरसनने बटलरच्या हाती झेल द्यायला भाग पाडत माघारी धाडले. तसेच, अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत देखील बटलरच्या हाती झेल देऊन तंबूत परतले.

हॅडिनने भारतीय संघाविरुद्ध केला होता हा कारनामा
जोस बटलरपूर्वी हा कारनामा ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज ब्रॅड हॅडिनने केला होता. त्याने २०१४ मध्ये ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाच्या पहिल्या ५ फलंदाजांचे झेल टिपले होते. तसेच या डावात त्याने एकूण ६ झेल टिपले होते. यासह दुसऱ्या डावात देखील त्याने ३ झेल टिपलेले.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारताच्या ‘या’ दिग्गजाला फोन करुन मदत माग, सातत्याने अपयशी ठरणाऱ्या विराटला गावसकरांचा सल्ला

भारतासाठी डोकेदुखी ठरत असलेला रुट आता मियाँदादचा ‘हा’ मोठा विक्रमही काढू शकतो मोडीत

विराटचा निर्णय चुकला? ‘भारताने खरे तर…’, टीम इंडिया शंभरच्या आत ऑलआऊट झाल्यावर ‘या’ दिग्गजाने केले ट्विट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---