इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम २९ सामन्यांनंतर कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आला. तरी, हा हंगाम सुरु असताना अनेकदा युवा क्रिकेटपटूंनी दिग्गज क्रिकेटपटूंच्या स्वाक्षऱ्या बॅट, जर्सी किंवा ग्लव्ह्जवर घेताना दिसून आले. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
राजस्थान रॉयल्सचा युवा यष्टीरक्षक फलंदाज अनुज रावतने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात राजस्थानचा आणि इंग्लंडचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने आयपीएल २०२१मध्ये वापरलेल्या त्याच्या ग्लव्ह्जवर स्वाक्षरी करत ते अनुजला भेट दिल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर अनुजच्या राजस्थानच्या टोपीवरही बटलरने स्वाक्षरी केली. आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित झाल्यानंतर इंग्लंडला परतण्याआधी बटलरने ही भेट अनुजला दिली आहे.
दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अनुजने या व्हिडिओला कॅप्शन देताना बटलरचे कौतुक केले आहे. त्याने लिहिले आहे की ‘एक उत्तम फलंदाज आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक चांगला व्यक्ती. तुझ्याबरोबर (बटलरबरोबर) ड्रेसिंग रुम शेअर करण्यान सन्मानजनक होते.’
https://www.instagram.com/p/COhUCW-l_Qn/
या क्षणाचे फोटो राजस्थान रॉयल्सने देखील शेअर केला असून त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की ‘एक आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज दुसऱ्याला काही भेट देताना.’
Something to keep, from one explosive keeper-batter to another. 💗#HallaBol | #RoyalsFamily pic.twitter.com/MtEcM9cFZ6
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 6, 2021
बटलरने अनुजला ग्लव्ह्ज आणि टोपीवर स्वाक्षरी देताना त्यावर संदेश लिहिला की ‘बेस्ट विशेश टू यू (तुला माझ्याकडून शुभेच्छा)’. खरंतर राजस्थान संघात आधीच संजू सॅमसन आणि बटलर हे यष्टीरक्षक म्हणून प्रमुख पर्याय आहेत. त्यामुळे अनुज हा राजस्थानकडे यष्टीरक्षक फलंदाज म्हणून एक ज्यादाचा पर्याय आहे.
आयपीएलचा १४ व्या हंगामातून अनुजने आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याने राजस्थानकडून सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध पदार्पणाचा सामना खेळला होता. मात्र, त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. तसेच बटलरसाठी हा हंगाम खास ठरला. त्याने या हंगामात हैदराबादविरुद्ध १२४ धावांची शतकी खेळी केली होती. तसेच या हंगामात खेळलेल्या ७ सामन्यांत त्याने २५४ धावा केल्या आहेत.
बटलरने जयस्वाललाही दिली स्वाक्षरी
बटलरने मायदेशी परतण्यापूर्वी आपला संघ सहकारी यशस्वी जयस्वाल याला देखील एक भेटवस्तू दिली आहे. मायदेशी जाण्यापूर्वी जोस बटलरने त्याला आठवण म्हणून एक बॅट भेट दिली आहे. या बॅटवर त्याने “आपल्या प्रतिभेचा आनंद घे, माझ्याकडून खूप शुभेच्छा.”असे लिहिले आहे.
A special gift from a special opening partner. 💓#HallaBol | #RoyalsFamily | @yashasvi_j | @josbuttler pic.twitter.com/VE3QIE0kct
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 4, 2021
या हंगामात राजस्थानची कामगिरी संमिश्र राहिली होती. त्यांनी ७ सामन्यांतील ३ सामन्यात विजय मिळवले होते, तर ४ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच ते आयपीएलचा १४ वा हंगाम स्थगित करण्यात आला तेव्हा राजस्थान ६ गुणांसह गुणतालिकेत ५ व्या क्रमांकावर होते.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताबाहेर होणार आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांचे आयोजन? इंग्लंडनंतर आता ‘या’ देशानेही दिली ऑफर